तुमच्याकडे ‘हे’ 1 रुपयाचे नाणं आहे? तर तुम्ही होणार एका रात्रीत करोडपती! पण RBI काय म्हणतंय?

128

गेल्या काही दिवसांपासून जुन्या नाण्यांची आणि नोटांची खरेदी-विक्री सुरू आहे. असे अनेक ठिकाणं आहेत जिथे जुन्या नोटा आणि नाणी विकली जात आहेत. तुमच्याकडे हे १ रूपयांचे नाणे असेल तर तुम्ही एक रात्रीत करोडपती व्हाल, अशा प्रकारचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहेत. ऑनलाईन माध्यमातून या जुन्या नोटा, नाणी विकून लोकांना पैसे कमावण्याचे आमिष लोकांना दाखवण्यात येत आहे. त्यासाठी RBI च्या नावाचा वापरही केला जात आहे. तुम्हीही जुन्या नोटा विकत असाल किंवा घेत असाल तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

(हेही वाचाः RBI New Rule: तुमच्याकडे ‘या’ नोटा आहेत का? असतील तर त्यांची किंमत ‘शून्य’!)

आरबीआयने यासंदर्भात महत्त्वाची माहिती जारी केली असून, जुन्या नोटा आणि नाण्यांच्या विक्रीसाठी केंद्रीय बँकेचे नाव आणि लोगोचा वापर केला जात असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. अशा परिस्थितीत तुम्हीही या नोटा विकत घेण्याचा किंवा विकण्याचा विचार करत असाल तर आधी ही बातमी वाचा.

RBI ने दिली महत्त्वाची माहिती

ऑनलाइन फसवणूक करणारे सतत ग्राहकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यासाठी ते रोज नवनवीन मार्ग शोधत असतात. रिझर्व्ह बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरील ट्विटमध्ये म्हटले की, “रिझर्व्ह बँकेच्या लक्षात आले आहे की, काही लोक भारतीय रिझर्व्ह बँकेचे नाव, लोगो आणि विविध ऑनलाइन, ऑफलाइन प्लॅटफॉर्मद्वारे चुकीच्या पद्धतीचा वापर करत आहेत.” अशाप्रकारच्या कुठल्याही व्यवहारांशी आरबीआयचा कुठलाही संबंध नसून, त्यासाठी आरबीआयकडून इतर कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही, तसेच कुठल्याही प्रकारचे कमिशन देखील घेतले जात नाही. तसेच अशा व्यवहारांसाठी आरबीआयकडून कोणतीही संस्था अथवा व्यक्तीला कोणतेही अधिकार देण्यात आले नसल्याचेही आरबीआयने स्पष्ट केले आहे.

आरबीआयने केली भूमिका स्पष्ट

आरबीआय अशा प्रकरणांमध्ये व्यवहार करत नाही आणि कोणाकडूनही असे कोणतेही शुल्क किंवा कमिशन कधीच आकारत नाही. बँकेने असेही म्हटले, भारतीय रिझर्व्ह बँकेने अशा व्यवहारांवर रिझर्व्ह बँकेच्या वतीने कोणतेही शुल्क किंवा कमिशन आकारण्याचा कोणताही अधिकार कोणत्याही संस्था, कंपनी किंवा व्यक्ती इत्यादींना दिलेला नाही. दरम्यान रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाने सामान्य जनतेला अशा बनावट आणि फसव्या ऑफर्सच्या जाळ्यात न अडकण्याचे आवाहन देखील दिले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.