Kaali Poster Row: काली पोस्टर वादादरम्यान मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले माँ काली…

137

 चित्रपट निर्माती लीना मणिमेकलाई हिने केलेल्या वादग्रस्त ट्विटर पोस्टवरुन सोशल मीडियावर चांगलाच वाद रंगला आहे. ‘काली’ या डॉक्युमेंट्री फिल्मचं पोस्टर लीना हिने ट्विटरवर शेअर केले होते. या पोस्टरमध्ये हिंदू देवी-देवतांचा अपमान करण्यात आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर लीना हिच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. देवी कालीवरील पोस्टरवरून सुरू असलेल्या या वादादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं विधान केल्याचे समोर आले आहे. माँ काली हे संपूर्ण भारताच्या भक्तीचे केंद्र असून त्यांचे आशीर्वाद कायम देशावर राहोत, असे मोदी म्हणाले.

(हेही वाचा – आदित्य ठाकरे वगळता शिवसेनेच्या ५३ आमदारांना विधिमंडळाची नोटीस)

स्वामी आत्मस्थानंदजींच्या जन्मशताब्दीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशाला संबोधित करत होते. यावेळी ते म्हणाले, आपल्या देशात संन्याशांची मोठी परंपरा आहे. त्यागाचे अनेक प्रकार आहेत. संन्यासाचा अर्थ म्हणजे स्वतःसाठी न जगता समुहासाठी जगणे, समुहासाठी कार्य करणे. पुढे मोदी असेही म्हणाले, स्वामी विवेकानंदांनी महान संत परंपरेला आधुनिक स्वरूपात साकारले आहे. स्वामी आत्मस्थानानंदजींनीही संन्याशाचे हे रूप वास्तव्य करून साकारले. आपल्या संतांनी आपल्याला दाखवून दिले आहे की जेव्हा आपले विचार व्यापक असतात तेव्हा आपण आपल्या प्रयत्नात कधीही एकटे पडत नाही.

स्वामी रामकृष्ण परमहंस हे असे संत होते, ज्यांनी माँ कालीची मुलाखत घेतली होती, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य माँ कालीच्या चरणी समर्पित केले होते. रामकृष्ण परमहंस म्हणायचे की हे सर्व जग, हे परिवर्तनशील आणि स्थिर, सर्व काही आईच्या चैतन्याने व्याप्त आहे. बंगालच्या काली पूजेत ही जाणीव दिसते. माँ कालीचे असीम आशीर्वाद सदैव भारतावर आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदींच्या काली माँ संदर्भातील वक्तव्यानंतर भाजपच्या आयटी सेलचे प्रभारी अमित मालविया यांनी ट्विट करत ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी माँ कालीबद्दल भक्तिभावाने बोलले. ती केवळ बंगालसाठीच नाही तर संपूर्ण भारतासाठी श्रद्धेचे केंद्र आहे. दुसरीकडे, टीएमसी खासदाराने माँ कालीचा अपमान केला आणि त्या खासदारावर कारवाई करण्याऐवजी ममता बॅनर्जी माँ कालीबद्दलच्या निंदनीय विधानाचा बचाव करतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.