महाराष्ट्रापाठोपाठ आता गोव्यातही ‘ऑपरेशन लोटस’

136

देशात भाजपाचा दबदबा सुरु आहे. कर्नाटक, मध्य प्रदेशानंतर महाराष्ट्रात भाजपाने बहुमत नसताना ऑपरेशन लोटस राबवले. गोव्यात आधीच भाजपाला बहुमत प्राप्त झाले होते. त्याआधारे भाजपाने सरकार स्थापन केले आहे. तरी या राज्यात काँग्रेसचे  विधिमंडळातून समूळ उच्चाटन करण्यासाठी भाजपाने गोव्यातही ऑपरेशन लोटस राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

१० आमदार भाजपात जाणार 

भाजपा गोव्यात राजकीय भूकंप राबवणार आहे. काँग्रेसचे 11 पैकी 10 आमदार भाजपात विधिमंडळ गटात विलीनीकरण करण्याच्या तयारीत असल्याचे समोर येत आहे. महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपा  श्रेष्ठींकडूनही यासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे आता गोव्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. गोव्यात काँग्रेस विधिमंडळ गटात मोठी फूट पडली आहे. रविवारी, १० जुलै रोजी सायंकाळपर्यंत दहा आमदारांचा हा गट भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सोमवार 11 जुलैपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर गोव्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडून देणाऱ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विरोधी पक्ष नेते मायकल लोबो यांच्यासह अन्य 9 काँग्रेस आमदार असे एकूण दहा जणांचा गट भाजपात विलीन करण्याबाबत ठाम असल्याची माहिती समोर येत आहे.

(हेही वाचा आदित्य ठाकरे वगळता शिवसेनेच्या ५३ आमदारांना विधिमंडळाची नोटीस)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.