‘बेस्ट’ कामगारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी द्वार सभेचे आयोजन

107

जाचक ड्युट्यांचे शेड्युल, चुकीचे काम वाटप अधिकाऱ्यांची मनमानी, तसेच ज्येष्ठ कामगारांचा विचार न करता रुट जॉईन करून डुट्या वाढवणे यांसदर्भात गेल्या काही दिवसांपासून बेस्ट कामगांरामध्ये प्रचंड असंतोष होता. म्हणूनच २७ जून रोजी यासंदर्भात बेस्ट कामगार संघटनेने बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेशचंद्रा व रविंद्र शेट्टी यांची भेट घेतली होती. यानंतर कामगारांचा असंतोष दूर करण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते परंतु तरीही यावर काही तोडगा न निघाल्यामुळे बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीच्या शशांक राव, विठ्ठल गवस, नितीन पाटील, कागिनकर, गायकवाड, ज. म. कहार यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी नगर आगार येथे संयुक्त द्वार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

( हेही वाचा : Monsoon Travel : काय झाडी, काय डोंगर, काय ते धबधबे! मुंबईजवळचे ‘जव्हार’ आहे वन डे पिकनिकसाठी एकदम ओके)

द्वार सभेचे आयोजन

कर्मचाऱ्यांची पहिली शिफ्ट कमी तासांची व दुसरी शिफ्ट जास्त तास, चुकीचे काम वाटप व अधिकाऱ्यांची मनमानी, तसेच ज्येष्ठ कामगारांचा विचार न करता रुट जॉईन करून डुट्या वाढवण्यात आल्या. काम करताना कामगारांना होणारा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मानसिक त्रास यामुळे कामगारांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे अशी कर्मचाऱ्यांची तक्रार असून यामुळेच कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आता बेस्ट कृती समितीने द्वार सभेचे आयोजन केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.