जेजे रुग्णसेवेसमोर उभी राहिली तांत्रिक अडचण

124
रुग्णसंख्येचा भार हलका करण्यासाठी जेजे रुग्णसमूहात गेल्या खूप वर्षांपासून सुरु असलेल्या रुग्णांच्या डिजीटल नोंदणीला आठवड्याभरापासून खीळ बसल्याचे उघडकीस आल्यानंतर अखेरीस जेजे रुग्णालय प्रशासनाकडून याबाबतचे स्पष्टीकरण दिले गेले. आर्थिक चणचणीमुळे या डिजीटल प्रणालीला खीळ बसल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत जेजे रुग्णालय प्रशासनाने आता कर्मचा-यांच्या मदतीने रुग्णसेवा सुरळीत सुरु असल्याचा दावा केला आहे.
बाह्य रुग्ण विभागाला भेट देणा-या नव्या तसेच जुन्या रुग्णांची नोंद, त्यांचा तपासणी अहवालाचा तपशील डिजीटल नोंदीत ठेवला जायचा. पेपररहीत रुग्णसेवेमुळे जेजेच्या मुख्य रुग्णालयात गर्दी आटोक्यात राखण्यास मदत होत होती. एकट्या जेजे रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागाला अंदाजे मोठ्या संख्येने हजार रुग्ण दर दिवसाला भेट देतात. या गर्दीच्या आयोजनासाठी स्वतंत्र इमारतीत उभ्या राहिलेल्या बाह्य रुग्ण विभागातील गर्दी आटोक्यात यायची. प्रशासनाच्या दाव्यानुसार. जेजे रुग्णालयात दर दिवसाला अडीच ते तीन हजारांच्या संख्येत बाह्य रुग्णसेवा दिली जात आहे. प्रत्यक्षात हा आकडा अंदाजे सात हजारांच्या घरात असल्याचे बोलले जात आहे. पेपररहित सेवेला खीळ बसली असली तरीही इतर डिजीटल मदतीच्या माध्यमातून डॉक्टरांमध्ये संबंधित रुग्णाच्या अहवालाचे आदान प्रदान होत आहे. मात्र याबाबतचे अधिक स्पष्टीकरण जेजे रुग्णालय समूह प्रशासनाने दिलेले नाही. रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणा-या रुग्णांच्या उपचारात अडचण निर्माण होऊ नये, म्हणून रुग्णांचा तपशील वैद्यकीय अभिलेख कक्षाकडेही ठेवल्याचे रुग्णालयाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
तपशील – सेंट जॉर्ज रुग्णालय – जी.टी.रुग्णालय – कामा रुग्णालय – जेजे रुग्णालय 
  • बाह्य रुग्ण – ११६ – ३२३ – ८३ – ९४९
  • आंतर रुग्ण – ६ – २ – १३८ – ३८
  • कॅज्युअल्टी रुग्ण – ५० – ५१ – १३ – ४७
  • पॅथॉलॉजी तपासण्या – ६५ – १५ – २३० – १९७
  • रेडिओल़जी तपासण्या – ६१ – ४४- ४८ – ३५६
  • बायोकेमेस्ट्री तपासण्या – २७१ – ६७ – १०२ – १०१८
  • मायक्रोबायोलॉजी तपासण्या – ३३ – २५ – ०० – ६
  • डायलिसीस – ०० – ०० – ०० – ६
  • मोठ्या शस्त्रक्रिया – ०० – ०३ – ०१ -२३
  • लहान शस्त्रक्रिया – ०० – ०४ – ०० – ०६
  • पोस्ट मार्टेम – ०० – ०१- ०० – ०२
  • इतर – ०० – ०० – ०० – ००
  • एकूण – ६३२ – ६५६ – ६१५ – २ हजार ७६४
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.