गेल्या काही दिवसांपासून विमानकंपनी स्पाइसजेट चांगलीच चर्चेत आहे. अशातच आता SpiceJet मधून SpiceXpress वेगळं होणार असल्याचे सांगितले जात आहे. बँका आणि भागधारक म्हणजेच शेअर होल्डर्सनी कार्गो आणि लॉजिस्टिक कंपनी स्पाइसएक्सप्रेसचे स्पाइसजेट एअरलाइनमधून विलग करण्यास मान्यता दिली असल्याची माहिती स्पाइसजेटचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग यांनी दिली. यासह ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात विभागणी पूर्ण होईल, असेही ते म्हणाले.
(हेही वाचा – विजय माल्याला ‘या’ प्रकणात २ हजारांच्या दंडासह ४ महिने तुरूंगवास!)
गेल्या वर्षी स्पाइसजेटने 17 ऑगस्ट रोजी असे सांगितले होते की, स्पाइसजेट त्यांच्या विक्रीच्या आधारावर आपली कार्गो आणि लॉजिस्टिक सेवा उपकंपनी स्पाईसएक्सप्रेस डिमर्ज अर्थात वेगळे करणार आहे. असे केल्यात स्वतंत्रपणे निधी उभारण्यात मदत होईल आणि वेगवान आर्थिक वाढ होईल. दरम्यान, स्पाइसजेट सध्या DGCA च्या तपासणीच्या फेऱ्यात आहे. 19 जूनपासून स्पाइसजेटच्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाडाच्या किमान आठ घटना घडल्या होत्या. त्यामुळे पाच दिवसांपूर्वी, या विमान कंपनीला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
SpiceJet मध्ये 18 दिवसांत 8 वेळा बिघाड, DGCA ने बजावली कारणे दाखवा नोटीस
स्पाइसएक्सप्रेस ही स्वतंत्र कंपनी होणार
ही एअरलाइन सुरक्षित, कार्यक्षम आणि विश्वासार्ह हवाई सेवा देण्यात अपयशी ठरली आहे. या नोटीसला उत्तर देण्यासाठी स्पाइसजेटला तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांपासून विमान कंपनी तोट्यात आहे. दुसरीकडे, स्पाइसएक्सप्रेसचे उत्पन्न वाढतच आहे. अजय सिंह म्हणाले, स्पाईसएक्सप्रेस नावाची एक वेगळी कंपनी होणार असून त्याची मालकी मात्र स्पाइसजेटकडे असेल, असेही डीजीसीएने म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community