गेल्या आठवड्यात ८ जुलैला झालेल्या ढगफुटीनंतर स्थगित करण्यात आलेल्या अमरनाथ यात्रेला आज, सोमवारीपासून पुन्हा सुरूवात झाली आहे. जम्मू बेस कॅम्पमधून सकाळी भविकांचा गट पवित्र अमरनाथ गुफेच्या दर्शनासाठी रवाना झाला परंतु, ढगफुटी झाल्याच्या घटनेत बेपत्ता झालेल्या 40 भाविकांचा अद्याप शोध लागला नसून ते बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.
(हेही वाचा- शिंदे गटाचे प्रतोद थोडक्यात बचावले, मुंबईतील फ्री वे-वर ७ गाड्यांची धडक)
अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी होऊन पूर
अमरनाथ गुहेजवळ 8 जुलै रोजी ढगफुटी होऊन पूर आला होता. या दुर्घटनेत 16 रुग्णांचा मृत्यू झाला असून अद्याप सुमारे 40 जण बेपत्ता आहेत. तर जखमी लोकांना एअरलिफ्ट करत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जखमींवर उपचार सुरु आहेत. या ठिकाणी अद्याप बचावकार्य सुरुच असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. यासंदर्भात सैन्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सैन्याकडून 4 हजार रडार लावण्यात आले आहेत. यामुळे ढिगाऱ्याखाली अडकललेल्या लोकांचा शोध घेण्यात मदत होणार आहे.
बेस कँम्पमधून यात्रेकरु अमरनाथ यात्रेसाठी रवाना
दरम्यान ढगफुटीमुळे स्थगित करण्यात आलेली यात्रा सोमवारपासून पुन्हा सुरु करण्यात आली आहे. सोमवारी सकाळीच जम्मू येथील बेस कँम्पमधून यात्रेकरु अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले आहेत. याआधी जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी बेस कँम्पची पाहणी करत यात्रेकरुंसोबत संवाद साधला. यावेळी यात्रेकरुंना योग्य सुविधा पुरवण्यात येतील असे आश्वासन दिले आहे.
Join Our WhatsApp Community