Train Boarding Station Rule : आता कोणत्याही स्थानकावरून तुम्हाला पकडता येईल ट्रेन

433

रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात तुम्ही सुद्धा सतत ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. अनेकवेळा स्थानकावर जाण्यास उशीर झाल्यास मूळ स्थानकाऐवजी जवळच्या सोयीस्कर स्थानकातून आपण ट्रेन पकडतो. म्हणजेच ज्या स्थानकावरून आपले तिकीट असते तेथून आपण ट्रेन न पकडता आपण दुसऱ्या स्थानकावरून ट्रेन पकडतो. अशा परिस्थितीत आपल्याला टीसी आपले तिकीट रद्द करेल अशी भिती वाटते.

( हेही वाचा : काय सांगता? या हिल स्टेशनच्या नावात आहेत ८५ अक्षरे! नाव उच्चारणे, वाचणेही कठीण)

अशावेळी तुम्ही तुमचे तिकीट जवळच्या स्थानकावरून रिव्हाइज करू शकता. प्रवाशांच्या सोयीसाठी IRCTC कडून हे नियम बदलण्यात आले आहेत. आयआरसीटीची ही सुविधा ज्या प्रवाशांनी ऑनलाइन तिकीट बुक केले आहे अशा प्रवाशांसाठी उपलब्ध आहे. ट्रॅव्हल एजंट किंवा प्रवासी आरक्षण प्रणालीद्वारे तिकीट बुक करणाऱ्यांना ही सुविधा लागू होणार नाही. ज्या प्रवाशांना त्यांचे बोर्डिंग स्टेशन बदलायचे आहे अशा प्रवाशांना गाडी सुटण्याच्या आधी २४ तास बोर्डिंग स्टेशन बदलावे लागेल. नव्या नियमांनुसार, एकदा प्रवाशाने त्याचे बोर्डिंग स्टेशन बदलले की, संबंधित प्रवासी मूळ स्टेशनवरून गाडी पकडू शकणार नाही.

बोर्डिंग स्टेशन बदलण्याची पद्धत

प्रवाशाने बोर्डिंग स्टेशन न बदलता दुसऱ्या स्थानकावरून ट्रेन पकडली तर दंडासोबतच बोर्डिंग पॉईंट आणि सुधारित बोर्डिंग पॉइंट दरम्यानचे भाडे भरावे लागेल. तुम्ही बोर्डिंग स्टेशन केवळ एकदाच बदलू शकता.

Online बोर्डिंग स्टेशन कसे बदलतात…

  • यासाठी तुम्हाला IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल
  • https://www.irctc.co.in/nget/train-search
  • लॉग इन आणि पासवर्ड सिलेक्ट करून तुम्ही Booking Ticket History मध्ये जा.
  • तुमची ट्रेन निवडा आणि change boarding point वर जा
  • वेब पेज ओपन झाल्यवर ड्रॉप डाउनमध्ये संबंधित ट्रेनसाठी नवीन बोर्डिंग स्टेशन निवडा
  • नव्या स्थानकाचे नाव सिलेक्ट केल्यावर सिस्टम confirmation साठी विचारले जाईल त्यानंतर OK वर क्लिक करा.
  • यानंतर तुमच्या मोबाईलवर बोर्डिंग स्टेशन बदलण्याचा SMS येईल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.