‘Work from Home’ कर्मचाऱ्यांचा कायदेशीर हक्क! ‘या’ सरकारने घेतला मोठा निर्णय!

164

देशभरात कोरोना महामारीने कहर केले असताना कोरोना संसर्ग पसरू नये म्हणून अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम हा पर्याय दिला होता. कोरोना वेगाने फैलत असताना लोकांनी जवळपास दोन वर्षे घरून काम केले. सर्वत्र लॉकडाऊन असताना लोकं आपली कार्यालयीन कामं घरून करत होते, कालांतराने वर्क फ्रॉम होम लोकांना अधिक सोयिस्कर वाटू लागले. यासह कंपन्यांचा कार्यालयीन देखभालीचा खर्च हा जवळपास नगण्य होता. या सर्व बाबी लक्षात घेता नेदरलँड सरकारने आता एक मोठा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचा – मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये, पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीने विदर्भ दौऱ्यावर)

समोर आलेल्या माहितीनुसार, नेदरलँड सरकारने कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम हा कायदेशीर अधिकार बनवण्यासाठी संपूर्ण ब्लू प्रिंट तयार केली आहे. गेल्या आठवड्यात डच संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने या संदर्भात कायदा तयार करण्यात आला. तर युरोपीय देश आता सिनेटच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

कर्मचाऱ्यांसाठी नेदरलँडचा मोठा निर्णय

वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, ग्रोइनलिंक्स पक्षाच्या सेना मॅटॉग यांनी सांगितले की, वर्क फ्रॉम होम हे कर्मचाऱ्यांना चांगले कामजीवन संतुलन करण्यास आणि प्रवासासाठी लागणारा सर्वाधिक वेळ कमी करण्यास फायदेशीर ठरेल. हे नवीन विधेयक नेदरलँड्स फ्लेक्सिबल वर्किंग ऍक्ट 2015 मध्ये एक सुधारणा आहे, जे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचे तास, वेळापत्रक आणि अगदी कामाच्या ठिकाणी बदलांची विनंती करण्यास अनुमती देते.

नेदरलँड हे कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी ओळखले जाते. नवा कायदा अशा वेळी आला आहे, जेव्हा जगभरातील कंपन्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात परत यावे, यासाठी धडपडत आहेत. तर सेल्सफोर्ससारख्या इतर कंपन्यांनी बहुतेक कार्यालयांमध्ये काम करणे पूर्णपणे बंद केले आहे. टेस्लासारख्या इतर काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कार्यालयात परतण्यास भाग पाडले तर टेस्लाचे संस्थापक आणि सीईओ एलोन मस्क यांनी कर्मचाऱ्यांना इशारा देत दोन पर्याय दिले आहेत, एक म्हणजे कार्यालयात परत या अन्यथा कंपनीतून बाहेर पडा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.