Train Running Status: रेल्वेच्या ‘या’ वेबसाईटवर कळणार ट्रेनचे लाईव्ह स्टेटस

204

भारतीय रेल्वेचे जाळे हे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे जाळ्यांपैकी एक मानले जाते. भारतीय रेल्वेकडून आपल्या प्रवाशांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. लांबच्या प्रवासासाठी जाणा-या ट्रेनचे लाईव्ह स्टेटस तपासणे आता अगदी सोपे होणार आहे. भारतीय रेल्वेकडून देण्यात आलेल्या वेबसाईटवरुन ट्रेनचे रनिंग स्टेटस आणि रिअल टाईमबाबतची माहिती देण्यात येत आहे.

या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्या मोबाईलद्वारे ट्रेनच्या वेळांबाबतची माहिती मिळणे सोपे होणार आहे.

असे तपासा ट्रेनचे लाईव्ह स्टेटस

  • https://enquiry.indianrail.gov.in/mntes/ या वेबसाईटवर जावे लागेल
  • त्यानंतर नवीन विंडोमध्ये तुम्हाला तुमचा ट्रेन नंबर किंवा ट्रेनचे नाव एंटर करावे लागेल
  • यानंतर स्टेशनचे नाव आणि तारीख प्रविष्ट करावी लागेल
  • आता तुम्ही निवडलेल्या स्टेशनवर ट्रेन येण्याची वेळ आणि तिथून ट्रेन सुटण्याची वेळ याबाबतची माहिती मिळेल
  • त्या स्टेशनवर ट्रेन किती वेळात येईल याची माहितीही तुम्हाला मिळेल
  • तसेच ट्रेनचं सध्याचं स्टेटस काय आहे, ती ट्रेन कोणत्या स्टेशनवरुन सुटली आहे, तिचं पुढचं स्टेशन कुठलं आहे याची माहिती तुम्हाला मिळेल
  • Full Running ऑप्शनमधून ट्रेनच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून शेवटच्या स्टेशनपर्यंतची माहिती उपलब्ध होईल
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.