आमचे राज्य आले आहे. शिंदे आणि फडणवीस यांना चांगले राज्य करून द्या. आता मार्ग हा कुटुंबप्रमुखाने काढायचा असतो. आम्ही त्यांना विनंती करू शकतो, पण त्यांना बांधील करू शकत नाही, असे म्हणत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साद घातली. तसेच आम्हाला विश्वास आहे की, साहेब लवकरच आम्हाला आशिर्वाद देतील. 1-2 सदस्य असे आहेत ज्यांना उद्धव ठाकरेंची रोज भेट मिळते, असा खुलासाही केसरकरांनी केला.
शिवसेना खासदारांकडून द्रौपदी मुर्मूंचे समर्थन योग्यच
सर्वोच्च न्यायालयामध्ये शिंदे गटाच्या आमदारांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयानंतर दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. एक सर्वसाधारण शिवसैनिक बोलू शकत नाही. बाळासाहेबांचे जुने शिवसैनिक बोलू शकत नाही. मन दुखवण्याचे प्रकार सोडून द्यावे. सर्व सामान्य शिवसैनिकांना वाटत नाही, काँग्रेसबरोबर जावे. तुम्ही हवे तर जनमताचा कौल घ्यावा. नगरपंचायंचीच्या निवडणुका झाल्या. त्यात दिसून आले. आमची शक्ती काँग्रेस-राष्ट्रवादीने घ्यायची आणि आमचा पक्ष संपवायचा हे योग्य नाही, अशी टीका केसरकरांनी केली. मला कळले की आज खासदारांची बैठक झाली. त्यात द्रौपदी मुर्मू यांना समर्थन देण्याचे ठरले आहे. ही आनंदाची बातमी आहे. आम्ही कुणीही उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर बोलणार नाही. आणि इतर कुणीही देवू नये अशी आमची भूमिका आहे. पण याचा अर्थ असा नाही की इतर लोक बोलले तर आम्ही काहीच बोलणार नाही. आम्ही आमच्या मित्र पक्षालाही सांगितले आहे की त्यांनी ही बोलू नये, असा इशाराही केसरकरांनी सोमय्यांचे नाव न घेता दिला.
(हेही वाचा ‘या’ प्रकरणी सोनिया गांधींची २१ जुलैला ED चौकशी)
Join Our WhatsApp Community