केरळमधील कुन्नूर जिल्ह्यातील पय्यानूर गावात राष्ट्रीय स्वयंसेवक कार्यालयावर बॉम्ब हल्ला झाल्याची माहिती मिळतेय. या कार्यालयावर बाहेरून अज्ञातांनी बॉम्ब हल्ला केला. हा बॉम्ब अज्ञातांनी फेकला असून कार्यालयाच्या खिडकीच्या काचा फुटल्याचे सांगितले जात आहे. पय्यानूर येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 10 वाजता ही घडना घडली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Kerala | Bomb hurled at RSS office in Payyannur, Kannur district. The incident happened early this morning with window glasses of the building broken in the attack, as per Payyannur police
— ANI (@ANI) July 12, 2022
केरळमधील कन्नूर जिल्ह्यातल्या पय्यन्नूरमध्ये हे आरएसएसचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या शेजारीच पोलीस स्टेशनही आहे. बॉम्ब हल्ला केल्यानंतर या इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. मात्र कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. या हल्ल्यानंतर अशा प्रकारच्या हल्ल्यांना रोखण्यात राज्य व्यवस्थापन अयशस्वी झाल्याचा आरोप भाजपा नेत्यांनी केला आहे. तर आरएसएस कार्यालयाच्या अगदी जवळ पोलीस स्टेशन असूनही हा हल्ला कसा झाला, असा प्रश्न उपस्थित होत असून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
(हेही वाचा – 9 हजार किलो वजनाचा अशोक स्तंभ पाहिलात का?)
यासंदर्भात स्थानिक भाजप नेत्यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या घटना धोकादायक आहेत. पोलीस स्टेशन अगदी 100 मीटर अंतरावर असतानाही अशा घटना घडणे दुर्दैवी आहे. हे दुर्लक्ष नाही तर अपयश आहे. या सगळ्याला पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार आहे. महाराष्ट्रातील कांदिवली मतदार संघाचे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे. हा बॉम्ब हल्ला केरळच्या डाव्या सरकारने पोसलेल्या कट्टरतावाद्यांचा कारनामा आहे. केंद्र सरकारने या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या पोशिंद्यांना ठेचून टाकावे, असे ट्वीट भातखळकर यांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community