मुंबईत काही सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे. मुंबईत सायन, गांधी मार्केट भागातून जाणाऱ्या वाहनांसाठी काही पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर या भागातून जाणाऱ्या बेस्ट बस देखील इतर मार्गांवरून वळवल्या आहेत.
( हेही वाचा : १ ऑक्टोबरपासून वाहनांच्या टायर्ससाठी लागू होणार ‘हे’ नवे नियम; रस्ते अपघात रोखण्यासाठी सरकारने घेतला मोठा निर्णय!)
सायन येथील बसमार्गात बदल
पावसामुळे शीव ( SION) येथे पावसाचे पाणी साचल्याने या भागातील बसमार्गात बदल करण्यात आला आहे. शीव मार्ग क्रमांक २४ येथे पावसाचे पाणी साचल्यामुळे बस मार्ग क्र. ३४१, ४११, २२, २५, ३१२ या बसेसचे मार्ग सायन रोड ३ मार्गे सकाळी ९.३० वाजल्यापासून परावर्तित करण्यात आले आहेत.
Restored at 9.50 hrs. https://t.co/uztFdgVTIK
— BEST Bus Transport (@myBESTBus) July 13, 2022
बसमार्गावरील प्रवाशांचा वाढता प्रतिसाद विचारात घेऊन खालील मार्गावर बेस्टकडून अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
सी -१५ वरळी आगार ते मजास आगार
सी – ४० प्र ठाकरे उद्यान शिवडी बसस्थानक ते मजास आगार
सी – ६१ मुलुंड आगार ते ओवळेगाव
ए – २२० वांद्रे बसस्थानक ( पश्चिम) ते शेर्लीगाव
ए – २४९ अंधेरी स्थानक ( पश्चिम) ते सातबंगला बसस्थानक
ए – २७३ मालाड स्थानक ( पश्चिम) ते मालवणी ब्लॉक क्रमांक ५
ए – ३३४ मरोळ आगार ते जांभूळपाडा
ए – ३६९ चेंबूर वसाहक ते वाशीनाका एमएमआरडीए वसाहत