Indian Army Recruitment 2022 : भारतीय सैन्यात ‘या’ पदांवर भरती, दरमहा 2 लाखांहून अधिक पगार

166

भारतीय सैन्यात तुम्हाला काम करण्याची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. नुकतीच आर्मी हेडक्वार्टर सिलेक्शन बोर्डाने रोजगारासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. ही अधिसूचना तुम्ही indianarmy.nic.inवर बघू शकतात. यानुसार, जे चीनी दुभाषी आहेत ते प्रादेशिक सैन्य अधिकारी म्हणून काम करू शकतील.

काय आहे शेवटची तारीख

भारतीय लष्करातून चिनी दुभाषी व्यक्तींसाठी भरती करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे. भारतातील पुरुष आणि महिला यांच्याकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 आहे. विशेष म्हणजे माजी सैनिक प्रादेशिक आर्मी ऑफिसर या भरतीसाठी अर्ज करण्यास देखील पात्र आहेत. 5 पदे जनरल उमेदवारांसाठी आणि एक पद माजी सैनिकांसाठी आहे. चिनी भाषेतील पदवी असलेले उमेदवार या संधीचा लाभ घेऊ शकतात आणि भारतीय सैन्याचा एक भाग बनू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत नोकरी मिळवणाऱ्यांना दर महिना साधारण दोन लाखापर्यंत पगार मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

लेफ्टनंट- लेव्हल 10

  • 56,100 ते रु. 1,77,500 प्रति महिना

कॅप्टन – लेव्हल 10A,

  • 1,93,900 ते रु. 6,13,000 प्रति महिना.

मेजर – लेव्हल 11,

  • 2,07,200 ते रु.6,9,4000 प्रति महिना

लेफ्टनंट कर्नल – लेव्हल 12A,

  • 1,21,200 ते 2,12,400 प्रति महिना.

कर्नल – लेव्हल 13,

  • 1,30,600 ते रु. 2,15,900 प्रति महिना.

ब्रिगेडियर – लेव्हल 13A

  • 1,39,600 ते रु. 2,17,600 प्रति महिना.

असा करा अर्ज

ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायची इच्छा असेल तर त्यांनी भरलेल्या फॉर्मची हार्ड कॉपी इंडिया पोस्टाद्वारे खालील पत्त्यावर पाठवावी.

Directorate General Territorial Army, Integrated Headquarters of Ministry of Defence, ‘A’ Block,4 th Floor, Defence Office Complex, KG Marg, New Delhi – 110001

काय आहेत पात्रता

सिव्हिलिअन कँडिडेट
  1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 55% गुणांसह चीनी भाषेत पदवीधर.
  2. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून दोन वर्षांचा डिप्लोमा इन इंटरप्रिटेशन/एचएसके-IV स्तरावरील कोणत्याही विषयातील पदवीधर.
एक्स सर्व्हिस ऑफिसर (माजी सेवा अधिकारी)
  1. किमान ‘BX’ ग्रेडिंगसह SFL/AEC Trg कॉलेज आणि सेंटरमधून चीनी भाषेतील दोन वर्षांचा डिप्लोमा इन इंटरप्रिटेशनसह कोणत्याही शाखेतील पदवीधर.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.