२५०० रुपयांची दाढी आणि १०० कोटींची खंडणी…

162

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी एकनाथ शिंदे सरकारवर खडसून टिका केलेली आहे. त्यांनी असं म्हटलं की ‘सरकार एका विमानातून उतरुन दुसर्‍या विमानात बसतंय, २५०० हजार रुपयांची दाढी आणि कटिंग करतंय.’ आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे नवनिर्वाचित सरकार आहे. हे सरकार स्थिर व्हायला थोडा वेळ जाणार आहे.

( हेही वाचा : बस ड्रायव्हरची मुख्यमंत्र्यांना विनंती; सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल)

सुप्रिया सुळे गेली अडीच वर्षे ठाकरे सरकारच्या कारभारावर खुश होत्या. आता त्यांचं म्हणणं आहे की शिंदे सरकार २५०० हजार रुपयांची दाढी करतंय म्हणजे पैसे उधळतंय. शिंदेंनी उठाव केल्यानंतर आणि ते मुख्यमंत्री झाल्यापासून सोशल मीडियावर ‘दाढीवाल्याची चलती आहे’ अशा प्रकारचे मीम्स आले. दाढी हा विषय या निमित्ताने खूप गाजला. आता सुप्रिया सुळेंनी दाढीचा उल्लेख केला. म्हणजे त्यांनी एकनाथ शिंदेंवर हल्ला चढवला.

यावर सुप्रिया सुळे यांचे मत काय?

पण सुप्रिया सुळे १०० कोटीची खंडणी मात्र विसरल्या. ठाकरे सरकारमध्ये वाझे कांड झाला. त्यावर मात्र सुप्रिया सुळेंनी कधीच आक्षेप घेतला नाही. त्यावेळी मात्र त्या ठाकरे सरकारवर समाधानी होत्या. मग २५०० रुपयांनी दाढी केल्याने महाराष्ट्राचं आणि इथल्या पुरोगामी वातावरणाचं नुकसान होणार की १०० कोटींची खंडणी वसूल केल्याने नुकसान होणार आहे? सर्वात जास्त घातक महाराष्ट्रासाठी काय आहे? नवाब मलिक यांचे दाऊदशी असलेले सबंध पुरोगामी महाराष्ट्राला मजबूत करतात का? मग सुप्रियासुळेंच्या पुरोगामी महाराष्ट्राची व्याख्या तपासायला हवी.

मलिक आणि देशमुख हे दोघेही राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते आहेत आणि दोघेही आता जेलची हवा खात आहेत. त्यांच्यावरचे आरोप देखील भयंकर गंभीर आहेत. त्यांनी महाराष्ट्राचं आर्थिक नुकसान तर केलंच, पण महाराष्ट्राचं सांस्कृतिक नुकसान देखील केलं आहे. यावर सुप्रिया सुळे यांचं काय मत आहे?

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.