माहीम- दादरमधील आमदार, विभागप्रमुख सदा सरवणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात प्रवेश केल्यानंतर या विधानसभेतील तीन शाखाप्रमुखांसह दोन शाखा संघटक व इतर पदाधिकारी यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. सरवणकर यांनी पक्षाच्या विभाग प्रमुख पदासह इतर समर्थक पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यांचे पत्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.
(हेही वाचा – वणी गडावरील सप्तशृंगीचे मंदिर दीड महिना बंद! भक्तांसाठी अशी असणार व्यवस्था)
सन २०१९मध्ये शिवसेना-भाजप यांनी महाराष्ट्रामध्ये संयुक्तपणे युतीमध्ये निवडणुका लढवल्या होत्या. शिवसेना- भाजप युतीमध्ये जनता जनार्दनाचा कौल मागितला आणि तसा तो मिळालाही. परंतु निवडणुकीनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोरब महाविकास आघाडी स्थापन केली. या महाविकास आघाडीमध्ये शिवसेनपा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मिळाले. परंतु आपली सत्ता आल्यानंतर कोणतेही विकासभिमुख कामे होऊ शकली नाही,अशा शब्दांत तक्रार करत माहिम- दादरमधील शिवसेना आमदार व विभागप्रमुख सदा सरवणकर यांनी आपल्या विभागप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे.
विभागप्रमुख पदाचा राजीनामा देताना त्यांच्या विभागातील शाखाप्रमुख संदीप देवळेकर, शाखाप्रमुख संतोष तेलवणे, शाखाप्रमुख मिलिंद तांडेल, महिला शाखा संघटक अरुधती चारी, महिला शाखा संघटक मंदा भाटकर, शाखा समन्वय अजय कुसम, उपविभाग समन्वयक कुणाल वाडेकर, महिला उपविभाग समन्वय शर्मिला हेमंत देसाई अशाप्रकारे ९ पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचे स्वाक्षरींचे पत्रच पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना पाठवले आहे.
या पत्रात सरवणकर यांनी आम्ही नाइलाजास्तव या पदाचा त्याग करत आहे. त्यामुळे या जबाबदारीतून मला मुक्त करावे अशाप्रकारे निवदेत करत संयुक्त राजीनाम्याचे पत्र उध्दव ठाकरेंना पाठवण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community