अश्विनी भिडे यांच्यावर मुंबई मेट्रो रेलच्या व्यवस्थापकीय संचालक पदाची अतिरिक्त जबाबदारी

155

राज्यातील ठाकरे सरकार जावून शिंदे आणि फडणवीस सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करत खात्यांचा खांदेपालट करण्यात येत आहे. त्यामुळे मेट्रो रेल्वे प्रकल्पाला गती देण्यासाठी आता महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहे.

( हेही वाचा : मुंबईकरांची ५० टक्के तहान भागेल एवढा तलावांत जमा झालाय पाणीसाठा )

व्यवस्थापकीय संचालक पदाची अतिरिक्त जबाबदारी

महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांना महत्वाच्या खात्यांची जबाबदारी न सोपवता त्यांना बाजुला करण्यात आले होते.त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यानंतर अश्विनी भिडे यांची पुन्हा एकदा एमएमआरडीएत वर्णी लागली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु या मंगळवारी १२ जुलै २०२२ रोजी अश्विनी भिडे यांच्याकडे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्याचा निर्णय घेत याबाबतचा आदेश जारी करण्यात आले आहे. त्यामुळे एस.व्ही.आर. श्रीनिवास यांच्याकडून याचा अतिरिक्त कार्यभार त्वरीत स्वीकारण्यास कळवले. त्यामुळे अश्विनी भिडे यांच्याकडे आता महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदासह मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार राहणार आहे. त्यामुळे आता महापालिकेच्या कोस्टल रोडसह मुंबईतील मेट्रो रेल्वे प्रकल्पाला आता मेट्रो वूमन गती देणार आहे.

अश्विनी भिडे यांच्यासह श्रीकर परदेशी आणि ठाणा जिल्हा परिषदेचे सीईओ भाऊसाहेब दांगडे यांचीही बदली करण्यात आली आहे. श्रीकर परदेशी यांची वर्णी उपमुख्यमंत्री यांच्या सचिवपदी करण्यात आली आहे, तर दांगडे यांची नियुक्ती कल्याण-डोंबविली महापालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.