राज्यात पुन्हा कोरोना कहर १३ जणांचा मृत्यू तर बीए व्हेरिएंटचे ९ रुग्ण सापडले

148

पुण्यात मंगळवारी राज्यात बीए व्हेरिएंटचे ९ रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. बीए आणि बीए ५ व्हेरिएंटचे ६ आणि बीए २.७५ व्हेरिएंटचे ३ नवे रुग्ण मंगळवारी आढळले. पुण्यात मोठ्या प्रमाणात बीए व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याने याबाबत शास्त्रीय आढावा घेतला जात आहे अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

आरोग्य विभागाची माहिती 

३१ मे ते ५ जुलै दरम्यान राज्यातील पुणे, अहमदनगर, सिंधुदुर्ग आणि सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या नमुन्यांची तपासणी झाली होती. त्यापैकी पुणे जिल्ह्यात ९ बीए व्हेरिएंट रुग्ण आढळले. पुण्याच्या बीए वैद्यकीय महाविद्यालयाने दिलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली. राज्यात १३ कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील आरोग्य यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे.

( हेही वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांना मान्सून गिफ्ट! लवकरच होणार महागाई भत्त्याची घोषणा)

ठाणे, कल्याण-डोंबिवली,वसई-विरार, पनवेल, नाशिक, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि अमरावतीत प्रत्येकी एका रुग्णाचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये २, पुण्यात ३ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला. आरोग्य विभागाने मंगळवारी १३ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची माहिती दिली. त्यापैकी ५ रुग्णांचा मृत्यू गेल्या २४ तासांत झाला. ७ रुग्णांचा मृत्यू गेल्या दोन दिवसांत झाला. एका रुग्णाचा मृत्यू गेल्या आठवड्यात झाला होता. कोरोना मृत्यू समितीकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर या रुग्णांच्या मृत्यूची माहिती आरोग्य विभागाने दिली.

राज्यात मंगळवारी २ हजार ४३५ नवे कोरोना रुग्ण आढळले असताना २ हजार ८८२ कोरोना रुग्णांना यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज दिला गेला. परिणामी, आता राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट दिसून आली असून, आता १७ हजार ५६७ कोरोना रुग्णांवर विविध भागांत उपचार दिले जात आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.