भारताची अवस्था देखील श्रीलंकेसारखी होईल का?

138

आपल्याकडे एक विचित्र गोष्ट सुरु असते. जगात काही वाईट झालं तर भारताची परिस्थिती देखील तशीच होईल किंवा यासाठी नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत अशी विधाने काही लोक करतात. मग तालीबानने अफगाणीस्थानावर कब्जा केला तर इथे लगेच बोंबाबोंब होते की नरेंद्र मोदी सुद्धा असंच करतील. युक्रेन आणि रशियाचं युद्ध झालं तर असं म्हणतात की, नरेंद्र मोदी भारताला युद्धाच्या खड्ड्यात ढकलत आहेत. श्रीलंकेमध्ये गोताबाया राजपक्षे पळून गेले तसे एक दिवस मोदी सुद्धा पळून जातील. श्रीलंकेकडून भारताने काहीतरी शिकायला हवे.

( हेही वाचा : बुडते ती निष्ठा, तरंगते ती विष्ठा; तरी सुद्धा यात्रेचं नाव निष्ठा?)

इम्रान खानला जसं त्यांच्या खुर्चीवरुन खाली खेचलं तसं मोदींना एक दिवस खेचतील. म्हणजे जगात कुठे काही झालं तर त्याची तुलना ओढूनताणून भारत आणि नरेंद्र मोदींशी करायची. या गोष्टी मुद्दामून केल्या जात आहेत. कारण या लोकांना भारताची प्रगती, विकास आणि भारतातील बंधूभाव बघवत नाही. या लोकांना भारताचं वाईट झालेलं हवं आहे. म्हणूनच नरेंद्र मोदींना आणि भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असतात.

कोरोनाचं इतकं मोठं संकट आलं तरी आपण त्यातून उत्तमरित्या मार्ग काढला. आपण जगाला वॅक्सिन पुरवलं, भारताच्या बाजूचा देश बरबाद झाला असला तरी आपण भारतात खूप मोठं सेवा कार्य सुरु ठेवलं. इतर देशांनाही आपण सेवा पुरवली. आज भारत स्वावलंबी होत आहे. मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया इ. च्या माध्यमातून देश पुढे पुढेच जातोय. अनेक राज्यांचा विकास होतोय.

उत्तर प्रदेश सारखं मागासलेलं राज्य आज प्रगती करतंय. इतक्या चांगल्या गोष्टी भारतात घडत असाताना इतर देशात काय होतंय याची तुलना भारताशी करणं कितपत योग्य आहे? अशा लोकांचं ढोंग आता बहुसंख्य जनतेला कळलेलं आहे. जनता आता त्यांच्या जाळ्यात अडकणार नाही. अशा गोष्टी विरोधकांनी केल्याने २०२४ साली पुन्हा मोदीच येणार यात दुमत नसावे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.