वसईत दरड कोसळली; ४ जणांना वाचवण्यात यश, तर काही जण अजूनही दरडीखाली

189

वसईच्या राजवली वाघरल पाडा या परिसरात दरड कोसळली आहे. या दरडीखाली 6 जण अडकले होते. त्यापैकी 4 जणांची सुटका करण्यात आली आहे. तर बाप- लेक असे दोघेजण अजूनही दरडीखालीच आहेत. वालीव पोलीस आणि वसई -विरार महापालिका अग्निशमन दलाचे जवान दुर्घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि बचावकार्य सुरु आहे.

मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ढेकाळेजवळ दरड कोसळली आहे. यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून, दरड हटवण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. एमएमआरडीएच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम झाल्यानंतर, खोदलेल्या टेकडीला कोणतीही संरक्षक भिंत तयार न केल्याने ही दरड कोसळल्याची माहिती समोर आली आहे.

( हेही वाचा: मुंबईसह ‘या’ भागांत पूरजन्य परिस्थिती … )

पालघर जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सोसाट्याच्या वा-यासह पाऊस सुरु आहे. यामुळे बुधवारी पहाटे पालघर तालुक्यातील सोमटा येथील परशुराम हाडळ यांचे घर कोसळले. घरासह घरातील सामग्रीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.