माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांची पक्षातून हकालपट्टी

147

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात सामिल झालेल्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शीतल म्हात्रे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिंदे गटात प्रवेश केला होता.

विभाग क्रमांक 1 मधील माजी नगरसेविका शीतल म्हात्रे आणि महिला उपविभाग संघटक गौरी खानविलकर यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

( हेही वाचा: ‘एकनिष्ठा हीच गुरुदक्षिणा’, संजय राऊतांनी लगावला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला )

शिवसेनेत गळचेपी होत होती 

शीतल म्हात्रे यांनी मंगळवारी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी त्यांनी शिवसेनेत गळचेपी होत असल्यानेच आपण हा निर्णय घेतल्याचे सांगितले. एकनाथ शिंदे यांनी बंड केले तेव्हा मी सुद्धा जे सर्व सामान्य शिवसैनिक करतो त्या पद्धतीने वागले. आम्हाला सुद्धा वाईट वाटलं. हे का आणि कसं झालं? असं मलाही वाटलं. त्यामुळे मीही शिंदे गटावर टीका केली, पण जेव्हा मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकलं, त्यांनी मांडलेली भूमिका ऐकली तेव्हा हेच तर आमचंही दुखणं आहे असं वाटलं. बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जावे हे प्रत्येक शिवसैनिकाला वाटते. महापालिकेत शिवसेनेच्या नगरसेवकांची खूप मोठ्या प्रमाणात गळचेपी होत आहे, असं शीतल म्हात्रे म्हणाल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.