राज्यातील शालेय बस नियमावली कडक होणार; आता लेटमार्क लावला, तर खैर नाही

117

शालेय बसचालक पॅनिक बटण आणि जीपीएस ट्रेकिंग, आदी नियमांकडे दुर्लक्ष करत निष्काळजीपणे विद्यार्थ्यांची वाहतूक करतात. त्यामुळे विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने वेळेत पोहोचत नाहीत. त्यामुळे पालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. राज्यभरातील शालेय बसेसची तपासणी करुन मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार, कारवाईचे आदेश प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांना परिवहन आयुक्तांनी दिले आहे.

एप्रिल महिन्यात मुंबईतील पोदार इंटरनॅशनल शाळेची बस पाच तास बेपत्ता झाली होती. बसमध्ये 15 विद्यार्थी होते. विद्यार्थी वेळेत घरी पोहोचले नसल्याने, पालकांच्या तोंडचे पाणी पळाले. त्यानंतर शाळा प्रशासन आणि पालकांमध्ये वाद होऊन मुंबईत बसची शोधमोहिम सुरु करण्यात आली होती. अखेर पाच तासांच्या शोधमोहिमेनंतर विद्यार्थी सुखरुप घरी पोहोचले. त्या बसवरील चालक नवीन असल्याने, त्याला रस्ते माहीत नव्हते. शिवाय त्याचा फोनसुद्धा लागत नव्हता. शाळा प्रशासनाने या घडल्या प्रकारावर माफी मागितली. त्यामुळे आता शालेय बस नियमावली कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काय होणार तपासणी?

  • शालेय बसमध्ये जीपीएस यंत्रणा, पॅनिक बटण अशा यंत्रणा लावण्यात आल्या आहेत का ?
  • या यंत्रणा सुरु आहेत का ? याशिवाय चालक प्रशिक्षित आहेत का? आणि शालेय बसेससाठी आखून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे का?
  • या दृष्टीने आता परिवहन विभागाकडून राज्यातील शाळेच्या बसेसवर कारवाई केली जाणार असल्याचे, परिवहन विभागाने सांगितले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.