देशात लवकरच 175 रुपयांचे स्मारक नाणे जारी होणार आहे. उत्तराखंडमधील रुरकी येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या स्थापनेला 175 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने केंद्र सरकार 175 वर्षे रुपयांचे विशेष नाणे जारी करणार आहे. नाण्यांचे अध्ययन करणारे सुधीर लुनावत यांनी याबाबत माहिती दिली.
या नाण्याची निर्मिती भारत सरकारच्या मुंबई टांकसाळमध्ये होणार आहे; तर नाण्याची अंदाजे किंमत 4 हजार रुपयांच्या आसपास असेल, त्यांनी सांगितले की, यापूर्वीही केंद्र सरकारने वेगवेगळ्या निमित्ताने 60 रुपये, 75 रुपये, 125 रुपये, 150 रुपये, 250 रुपये, 350 रुपये, 400, 500, 550 आणि हजार रुपयांचे स्मारक नाणे जारी केले होते.
( हेही वाचा: बाळासाहेबांच्या आशीर्वादानेच राज्याचा मुख्यमंत्री झालो – एकनाथ शिंदे )
नाण्याच्या दुस-या बाजूला अशोक स्तंभाच्या खालील बाजूला सत्यमेव जयते व ₹ च्या चिन्हासोबत 175 लिहिले असेल. उजवीकडे आणि डावीकडे हिंदी व इंग्रजीत रुपये आणि भारत लिहिलेले असेल.
Join Our WhatsApp Community