व्हाॅट्सअॅप वापरत असाल आणि ते अपडेट करण्यासाठी काही नोटिफिकेशन तुम्हाला मिळाले असेल तर सावध व्हा, कारण ते बनावट असू शकते आणि त्याद्वारे दुस-याच कंपनीचे बनावट अॅप डाऊनलोड होऊ शकते. यातून फसवणूकही होऊ शकते. काय आहे हे प्रकरण जाणून घ्या…
कोणी दिला इशारा?
व्हाॅट्सअॅपचे सीईओ विल कॅथकार्ट यांनी ट्वीटरवर यासंदर्भात इशारा दिला आहे. कोणतेही नवीन व्हर्जन सध्या व्हाॅट्सअॅप युझर्सनी वापरु नये. अन्यथा त्यांना मोठा फटका बसू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.
कसे आढळले डेंजर अॅप ?
हुबेहुब व्हाॅट्सअॅपसारख्या सेवा देणारे अॅप कंपनीच्या सुरक्षा संशोधन टीमला आढळले आहे.
कशी काळजी घ्याल?
आपले व्हाॅट्सअॅप अपडेट करायचे असेल तर केवळ व्हाॅट्सअॅपची अधिकृत वेबसाइट किंवा प्ले स्टोअरवरुनच ते करावे. इतर कोणत्याही वेबसाइटचा यासाठी आधार घेऊ नये.
( हेही वाचा: BEST@75 : बेस्टची पंचाहत्तरी; 7 ऑगस्टला साजरा होणार ‘अमृतमहोत्सवी बेस्ट दिन’ )
धोका देणारे अॅप कोणते?
- हेमाॅड्स या डेव्हलपर कंपनीने हे व्हाॅट्सअॅप नावाचे अॅप तयार केले आहे.
- ते धोकादायक असून, त्याचा फटका लोकांना बसू शकतो, असे मूळ व्हाॅट्सअॅप कंपनीचे म्हणणे आहे.
- हे नवे बनावट अॅप युझर्सना नवनवे फिचर्स देण्याचे अमिष दाखवते. त्याद्वारे युझर्सची पर्सनल माहिती चोरली जाते. डेटाही घेतला जातो.