केसरकरांनी शरद पवारांवर केलेले वक्तव्य बेजबाबदारपणाचे- महेश तपासे

149

बेकायदेशीर शिंदे सरकारचे बेकायदेशीर प्रवक्ते दिपक केसरकर यांनी शरद पवारांवर केलेले वक्तव्य बेजबाबदारपणाचे असल्याची टीका करत, त्याच भाषेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवारांवर दिपक केसरकर यांनी शिवसेना फोडल्याचा आरोप केला असून, या आरोपाला महेश तपासे यांनी जशास तसे उत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर लोटांगण घालणाऱ्या बंडखोर आमदारांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वेदना देण्याची खरी कृती केली आहे, तर शरद पवार यांनी त्यांचा स्वाभिमान, मैत्री जपण्याचे काम केल्याचे महेश तपासे यांनी ठणकावून सांगितले आहे.

बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची मैत्री सर्वश्रुत

शिवसेनेचा इतिहास किंवा जे लोक बाहेर पडले त्याची कारणे दिपक केसरकर यांना माहीत नसावी, असा टोला लगावतानाच बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची मैत्री सर्वश्रुत होती. याची आठवणही महेश तपासे यांनी दिपक केसरकर यांना करुन दिली आहे.

( हेही वाचा: बाळासाहेबांच्या आशीर्वादानेच राज्याचा मुख्यमंत्री झालो – एकनाथ शिंदे )

‘हे’ दीपक केसरकर विसरले

जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी सेनेला झिडकारले त्यावेळी पवारसाहेबांनी शिवसेना – कॉंग्रेस – राष्ट्रवादी या तीन पक्षाची मोट बांधून महाविकास आघाडी तयार केली व शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिले हे दिपक केसरकर सोयीस्करपणे विसरले आहेत असेही महेश तपासे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.