बॉलिवूडचा किंगखान शहारूख खानचा मुलगा आर्यन खानला पासपोर्ट परत करण्याचे आदेश स्पेशल कोर्टाने एनसीबीला बुधवारी दिले आहेत. आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात क्लीनचिट मिळाली आहे. १ जुलै रोजी आर्यन खानने विशेष एनटीपीएस कोर्टासमोर याचिका दाखल केली होती. यामध्ये त्याने पासपोर्ट परत करण्याची मागणी केली होती. गेल्यावर्षी आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज प्रकरण नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो म्हणजेच एनसीबीने अटक केली होती. अखेर स्पेशल कोर्टोने एनसीबीला आर्यन खानचा पासपोर्ट परत करण्याचे आदेश दिले आहेत.
(हेही वाचा – पवारांनी मुंबई मनपा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले! म्हणाले “कुणी सोबत…”)
मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खानसह इतर पाच जणांना पुरेशा पुराव्याअभावी क्लिनचिट दिली. आर्यन खानने जामिनाच्या अटींनुसार कोर्टात पासपोर्ट सादर केला होता. गुरूवारी त्याने त्याच्या वकिलांमार्फत विशेष कोर्टात याचिका दाखल केली. ज्यामध्ये त्याचे नाव नसलेल्या आरोपपत्राचा हवाला देत पासपोर्ट परत करण्याची मागणी केली होती.
या प्रकरणावर माहिती देताना आर्यन खानचे वकील अमित देसाई यांनी म्हटले की, जेव्हा एखाद्या आरोपीवर कारवाई करण्याचे थांबवले जाते तेव्हा जो आदेश न्यायालयाकडून दिला जातो, त्याचे पालन करणे बंधनकारक आहे. यावर विशेष न्यायाधीशांनी उलटप्रश्न केला, तुम्हाला आर्यन खानचा बेल बाँड आणि पासपोर्ट पुन्हा हवा आहे का, त्यावर ते म्हणाले आम्हाला एनसीबीकडून उत्तर मिळाले आहे. त्यांना आता आरोपी आर्यन खानकडून कोणत्याही प्रकारची तक्रार नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच त्यांच्याविरोधात कोणताही पुरावा मिळाला नसल्याने आता त्यांच्याविरोधात कोणत्याही प्रकारची चौकशी केली जाणार नाही.
Join Our WhatsApp Community