Monsoon Update : पालघर, नाशिकसह विदर्भातील या भागात रेड अलर्ट

148

गेल्या आठवड्याभरापासून पालघर, नाशिक, गडचिरोली आणि चंद्रपूरात थैमान घालणाऱ्या पावसाने बुधवारी विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात सकाळपासून जोर धरला. पावसाचा जोर वाढताच मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने बुधवारसाठी पालघर, नाशिक जिल्ह्यातील घाट परिसराक रेड अलर्ट कायम ठेवला. तर रायगड, नांदेड, पुणे, सातारा जिल्ह्यातील घाट परिसर तसेच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीसह रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

( हेही वाचा : ४८ तासांमध्ये मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे पूर्ववत करा; महापालिकेकडे भाजपने केली मागणी )

सकाळच्या साडेआठ वाजताच्या नोंदीत माथेरानमध्ये गेल्या 24 तासात 220 मिमी पाऊस झाला. पुण्यातील घाट परिसरात लोणावळा येथे 190 मिमी पावसाची नोंद झाली. महाबळेश्वरला 140 मिमी, कोल्हापूरमधील गगनबावडामध्ये 120 मिमी पाऊस झाला. पालघर जिल्ह्यातील वाडा परिसरात 150 मिमी पावासाची नोंद झाली. रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये 140 मिमी पाऊस पडला आहे.

कोकणात ऑरेंज अलर्ट

सकाळच्या साडेआठच्या नोंदीनुसार नांदेड जिल्ह्यातील किनवत येथे गेल्या 24 तासात 210 मिमी पावसाचा विक्रम झाला. नांदेड जिल्ह्याला गुरुवारसाठी रेड अलर्ट राहील. या भागात अतिमुसळधार पाऊस होईल. मराठवाड्यातील बहुतांश भागात 100 मिलीमीटरच्यावर पाऊस पडल्याचे वेधशाळेच्या पाहणीत आढळले. परभणी आणि हिंगोली, उस्मानाबादमध्येही रात्रभर पाऊस सुरु होता. बुधवारी परभणी, बीड, हिंगोली, उस्मानाबाद येथे अतिमुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट राहील. दरम्यान, कोकणातील ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीसाठी ऑरेंज अलर्ट मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने जारी केला आहे

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.