राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सामान्य कार्यकर्ता म्हणून कार्यरत – मुख्यमंत्री

136

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करीत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे यांच्या शिकवणीनुसार आम्ही काम करतोय; जेणेकरून सामान्य नागरिकांच्या जीवनात बदल घडून येईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

सामान्य नागरिकांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न

गुरूपौर्णिमेनिमित्त ते ठाणे येथील टेंभी नाक्यावरील आनंदाश्रमामध्ये आले होते. या वेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करीत त्यांना अभिवादन केले. आमदार संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रताप सरनाईक, डॉ. बालाजी किणीकर, रवींद्र फाटक, ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

( हेही वाचा : पावसात रेल्वेचा खोळंबा झाल्यास मिनिटात येईल अपडेट; रेल्वे प्रवाशांसाठी नवे अ‍ॅप!)

माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे यांची शिकवण आचरणात आणून सामान्य नागरिकांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहील. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.