महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत वन क्षेत्रपाल, उपसंचालक कृषी, कृषी अधिकारी, सहायक कार्यकारी अधिकारी, सहायक अभियंता, उपविभागीय जलसंधारण अधिकारी पदांच्या एकूण 588 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2022 आहे.
( हेही वाचा : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! MPSC अंतर्गत भरती; अर्ज करण्यासाठी शेवटचा १ दिवस शिल्लक)
जा. क्र. 63 ते 67/2022 महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा मुख्य परीक्षा 2021 करीता आयोगाच्या संकेतस्थळावर अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://t.co/kIeYzBWUYg. अर्ज करण्याचा कालावधी:- 15 ते 29 जुलै 2022
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) July 13, 2022
नियम व अटी
- परीक्षेचे नाव – MPSC तांत्रिक सेवा मुख्य परीक्षा 2021
- पदाचे नाव – वन क्षेत्रपाल, उपसंचालक कृषी, कृषी अधिकारी, सहायक कार्यकारी अधिकारी, सहायक अभियंता,
- उपविभागीय जलसंधारण अधिकारी
- पद संख्या – 588 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
- अर्ज शुल्क –
अमागास – रु. 544/-
मागासवर्गीय/ अनाथ/ दिव्यांग – रु. 344/- - अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 15 जुलै 2022
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जुलै 2022
- अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
- अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारले जातील.
- अर्ज https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर सादर करावे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाही.