ठाणे जिल्ह्यासाठी रेशनचे दर जाहीर; बघा कुठे किती असणार भाव?

118

मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत जुलै, 2022 साठी कौटुंबिक शिधापत्रिकेवर देय असलेल्या नियंत्रित शिधा, धान्याचे दर जाहीर करण्यात आहे आहेत. ते पुढील प्रमाणे आहेत .

(हेही वाचा – रेशन कार्डधारकांना मिळणार मोफत उपचार, काय आहे केंद्र सरकारची योजना?)

प्राधान्य कुटुंब –

  • तांदूळ रु. 3/- किलो दराने प्रती व्यक्ती 3 किलो,
  • गहू रु. 2/- किलोदराने प्रती व्यक्ती 2 किलो असे आहेत.

अंत्येादय अन्न योजना –

  • तांदूळ रु. 3/- किलो दराने प्रती शिधापत्रिका 20 किलो,
  • गहू रु. 2/- किलोदराने प्रती शिधापत्रिका 15 किलो असे आहेत.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना –

  • प्राधान्य कुटुंब व अत्योदय अन्न योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रती व्यक्तीला 3 किलो तांदूळ व 2 किलो गहू मोफत मिळणार

अंत्योदय अन्न योजना –

  • साखर रु.20/- दराने प्रति शिधापत्रिका 1 किलो असे आहेत.
बिगर गॅसधारक शिधापत्रिका असणाऱ्यांसाठी केरोसीनचे दर

ठाणे विभाग केरोसीन 

  • 36/फ ठाणे रु. 97.96/-,
  • 41/फ ठाणे रु. 97.96/-,
  • 48/फ मुंब्रा रु.97.96/-,
  • 41/फ वाशी रु. 97.96/-,
  • 41/फ भाईंदर रु. 97.96,
  • 38/फ कल्याण रु. 98.15/-,
  • 39 फ डोंबिवली (मुख्य) रु. 98.15/-,
  • 39/फ डोंबिवली (उप) रु. 98.15/-,
  • 40/फ उल्हासनगर (मुख्य) रु. 98.23/-,
  • 40/फ उल्हासनगर (उप) रु. 98.23/-,
  • 46/फ (अंबरनाथ) रु. 98.23/-,
  • 46/फ (बदलापूर) रु.98.23/-,

37/फ भिवंडी रु. 98.05/- प्रती लिटर 1 व्यक्ती 2 लिटर, 2 व्यक्ती 3 लिटर, व 3 व्यक्ती व वरील 4 लिटर देण्यात येणार असल्याचे शिधावाटप उपनियंत्रक ठाणे यांनी सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.