मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. कारण हे सरकार बेकायदेशीर आहे. महाराष्ट्र पुन्हा एकदा लाॅकडाऊनमध्ये गेला आहे, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. सध्या महाराष्ट्र वा-यावर आहे, राज्यपाल आता कुठे आहेत? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे.
शिवसेनेने राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर गुरुवारी मुर्मू या मुंबई दौ-यावर येणार आहेत. त्यामुळे सकाळपासूनच द्रौपदी मुर्मू मातोश्रीवर जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर उत्तर देताना, द्रौपदी मुर्मू या मातोश्रीवर याव्या म्हणून त्यांना पाठिंबा दिला नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. आमचा आदिवासी समाजाविषयीचा आदर आणि भावनेपोटी हा निर्णय आम्ही घेतला. राजकारणापलिकडे जाऊन आम्ही हा निर्णय घेतला आहे.
( हेही वाचा: असंसदीय शब्दांची यादी जाहीर; आता ‘हे’ शब्द वापरण्यावर निर्बंध, वाचा संपूर्ण यादी )
मंत्रीमंडळाचा विस्तार अद्याप का नाही
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. अजून काहीच सुरु झाले नाही. राज्यात पुरामुळे अनेक ठिकाणी लोकांचे मृत्यू झाले आहेत. अतिवृष्टीमुळे उद्धवलेल्या परिस्थितीवर सरकारचे लक्ष नाही. मंत्रालयही ठप्प पडले आहे. शपथ घेऊन देखील कामकाज सुरु झालेले नाही. मंत्री अजून का बनले नाहीत? असा सवालही संजय राऊत यांनी यावेळी केला.
Join Our WhatsApp Community