सायबर सिक्युरिटीसारख्या महत्त्वाच्या विषयाच्या ऑडिटचे काम कमी अनुभव असलेल्या आयसेक सिक्युरिटी कंपनीला का दिले, याचा खुलासा करण्यासंदर्भात ईडीने बुधवारी राष्ट्रीय शेअर बाजाराला कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ही कंपनी स्थापन केली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराकडून या संदर्भात खुलासा प्राप्त झाल्यानंतर, या प्रकरणात मनी लाॅंड्रिंगचा आणखी एक नवा गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रीय शेअर बाजारात झालेल्या को-लोकेशन घोटाळ्यात मनी लाॅंड्रींग झाल्याच्या संशयावरुन ईडीने मुंबईचे निवृत्त पोलीस आयुक्त संजय पांडे यांची 5 जुलै रोजी दिल्ली येथे तीन तास चौकशी केली होती. या चौकशीमध्ये ईडीच्या अधिका-यांनी एनएसई-को-लोकोशन घोटाळ्यासंदर्भात पांडे यांना काही प्रश्न विचारत त्यांचा जबाब नोंदवला. पांडे यांचा जबाब मनी लाॅंड्रींग कायद्यातील फौजदारी कलमांतर्गत नोंदवल्याचे समजते.
( हेही वाचा: महाराष्ट्र वा-यावर; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे सरकार नाही: संजय राऊत )
निवडक ब्रोकर्सना फायदा
2010 ते 2015 या कालावधीत राष्ट्रीय शेअर बाजारातील सर्व्हर आणि आयटी सिक्युरिटी ऑडिटचे काम संजय पांडे यांनी 2001 साली स्थापन केलेल्या आय-सेक- सिक्युरिटीज प्रा.लि. या कंपनीला मिळाले होते. याच काळात एनएसईमध्ये को-लोकेशन घोटाळा झाल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. एनएसई- को लोकेशन घोटाळ्यात निवडक ब्रोकरना फायदा करुन देण्यात आला होता.
Join Our WhatsApp Community