पुणे-सोलापूर-पुणे धावणारी (इंद्रायणी) एक्स्प्रेस (क्र. १२१६९/७०) १८ जुलैपासून धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. तसेच १० ऑगस्टपासून पुणे-हैदराबाद इंद्रायणी एक्स्प्रेस सुरू करण्याचाही आदेश रेल्वे मंडळाने दिला आहे. ही बातमी समजताच याविषयी प्रवासी संघटनांनी आनंद व्यक्त केला आहे. प्रवाशांच्या वतीने रेल्वे प्रशासनाचे आभार मानत आता सोलापूरकरांना अधिक सोयीचे झाल्याचे मत व्यक्त केले आहे.
अडीच वर्षांनंतर ‘इंटरसिटी एक्स्प्रेस’ पुन्हा धावणार
दोन वर्षांपूर्वी कोरोना संसर्ग काळातील लॉकडाऊनमध्ये सर्व रेल्वे बंद केल्या होत्या. त्यात पुणे सोलापूर इंटरसिटी एक्स्प्रेसचाही समावेश होता. आता सर्व गाड्या सुरू झाल्या तरी सोलापूर विभागातील इंटरसिटी सुरू नव्हती. प्रवासी संघटनांनी गाडी सुरू करण्याची वारंवार मागणी केली होती. मात्र याबाबत मौन साधत रेल्वे मंडळाने लवकरच सुरू करू, असे मोघम उत्तर देत वेळ मारून नेण्यात धन्यता मानली होती. बुधवारी रेल्वेगाडी सुरू करत असल्याचे पत्र पाठवून रेल्वे प्रशासनाने सर्वांना आनंदाचा धक्का दिला आहे. एकूण २८ महिने ही गाडी बंद करण्यात आली होती. त्यामुळे अडीच वर्षांनंतर ‘पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस’ पुन्हा धावणार आहे.
(हेही वाचा – मीरा-भाईंदरमधील शिवसेनेचे १८ नगरसेवक शिंदे गटात!)
ही गाडी १८ जुलै २०२२ रोजी पुणे स्थानकावरून सकाळी ९.३० वाजता सुटेल आणि पुढील स्थानक, दौंड आगमन १०.३३ प्रस्थान १०.३५, जेऊर आगमन ११.३४ प्रस्थान ११.३५, कुर्डुवाडी आगमन १२.०३ प्रस्थान १२.०५, सोलापूर ०१.२५ वाजता पोहोचणार आहे. तर सोलापूर-पुणे एक्सप्रेस सोलापूर स्थानकावरून दुपारी २ वाजता सुटेल आणि पुढील स्थानक कुर्डुवाडी आगमन २.४७ प्रस्थान २.५०, जेऊर आगमन ३.१९ प्रस्थान ०३.२०, दौंड आगमन ०४.३८ प्रस्थान ०४.४०, पुणे ०६.०५ वाजता पुण्यात पोहोचणार आहे.
Join Our WhatsApp Community