देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरु झाल्यापासून देशभरातून या मोहिमेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी नागरिक प्रतिबंधात्मक लस घेत आहेत. पण याच लसीकरण मोहिमेबाबत अनेक अफवा पसरवण्यात येत आहेत.
कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना सरकारकडून 5 हजार रुपये देण्यात येतील, असा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याचबाबत आता केंद्र सरकारच्या फॅक्ट चेक विंगकडून खुलासा करण्यात आला आहे.
(हेही वाचाः EPFO: PF मधून पैसे काढण्याच्या नियमांत मोठा बदल, आता होणार दुप्पट फायदा)
काय आहे व्हायरल मेसेज?
पंतप्रधान जनकल्याण विभागाद्वारे कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना 5 हजार रुपये देण्यात येतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन फॉर्म भरा, असा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याचबाबत केंद्र सरकारच्या पीआयबी फॅक्ट चेक विंगने स्पष्टीकरण दिले आहे. हा मेसेज फेक असून, अशाप्रकारच्या कुठल्याही मेसेजवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पीआयबी फॅक्ट चेक विंगकडून करण्यात आले आहे.
एक वायरल मैसेज में दावा किया जा रहा है कि जिन लोगों ने कोविड वैक्सीन लगवा ली है उन्हें एक ऑनलाइन फॉर्म भरने के बाद प्रधानमंत्री जन कल्याण विभाग द्वारा ₹5,000 प्रदान किए जा रहे हैं #PIBFactcheck:
▶️ इस मैसेज का दावा फर्जी है
▶️ कृपया इस फर्जी मैसेज को फॉरवर्ड न करें pic.twitter.com/AV8asQzexu— PIB Fact Check (@PIBFactCheck) July 12, 2022
फेक मेसेजपासून सावधान
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या मेसेजवरील लिंकवर क्लिक करू नये आणि हा मेसेज फॉरवर्ड करू नये, असेही पीआयबीकडून सांगण्यात आले आहे. तसेच व्हायरल होत असलेल्या अशा अनेक फेक मेसेजपासून सावध राहण्याचे आवाहनही सरकारकडून करण्यात येत आहे.
(हेही वाचाः राज्यात पेट्रोल-डिझेल स्वस्त, शुक्रवारपासून प्रमुख शहरांत असे असतील नवे दर)
Join Our WhatsApp Community