अखेर भांडुप मलजल प्रक्रिया केंद्राच्या प्रस्तावाला मंजुरी

140

मुंबईतील बहुचर्चित मलजल प्रक्रिया केंद्रांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनंतर याबाबतच्या प्रस्तावांना आता महापालिकेचे प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी मंजुरी देण्यात आली आहे. भांडुप वगळता धारावी, वांद्रे, मालाड, वर्सोवा,घाटकोपर आणि वरळी या सहा मलजल प्रक्रिया केंद्रांच्या प्रकल्पांना प्रशासकांनी मंजुरी दिल्यानंतर उर्वरीत भांडुपमधील मलजल प्रक्रीया केंद्राचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे.

( हेही वाचा : अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांचे पुनर्वसन सप्टेंबर अखेरपर्यंत तात्पुरत्या निवासांत)

महानगरपालिकेकडून मुंबई महानगरात वरळीमध्ये (५०० दशलक्ष लीटर प्रतिदिन), वांद्रे येथे (३६० दशलक्ष् लीटर प्रतिदिन) मालाडमध्ये (४५४ दशलक्ष लीटर प्रतिदिन) घाटकोपरमध्ये (३३७ दशलक्ष लीटर प्रतिदिन) धारावीमध्ये (४१८ दशलक्ष लीटर प्रतिदिन) भांडुपमध्ये (२१५ दशलक्ष लीटर प्रतिदिन) आणि वेसावे (वर्सोवा) येथे (१८० दशलक्ष लीटर प्रतिदिन) याप्रमाणे एकूण ७ केंद्र उभारणे नियोजित आहे. त्यासाठी सुमारे २६ हजार कोटी रुपये खर्चाच्या निविदा काढण्यात आली होती. त्यानुसार भांडुप वगळता उर्वरीत सर्व केंद्रांच्या प्रस्तावांना प्रशासकांची मंजुरी प्राप्त झाली होती

भांडुप मल जल प्रक्रिया केंद्राच्या निविदेमध्ये अंदाजित दरापेक्षा कमी बोली लवण्यात आली असून निम्म्या दरात ही बोली लागल्याने याबाबतची निविदा वादात अडकली आहे.

भांडुप मलजल प्रक्रीया केंद्राच्या २१५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या प्रकल्पासाठी १२६२ कोटींचे कंत्राट देण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाने यासाठी २१०० कोटी रुपयांचा अंदाजित खर्च अपेक्षिला होता. परंतु प्रत्यक्षात निविदेमध्ये ५३ टक्के कमी बोली लावून यासाठी आयडब्ल्यूआयएल-ओएमआयएएल-एसपीएमएल ही संयुक्त भागीदारीतील कंपनी पात्र ठरली आहे. यापूर्वी दोन वेळा मागवलेल्या निविदांमध्ये या कामांसाठी अनुक्रमे ६१ आणि ३३ टक्के अधिक बोली लावण्यात आली होती, परंतु या निविदांमध्ये वाढीव बोली लावल्यामुळे या निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. या प्रकल्पाचे काम चार वर्षांमध्ये पूर्ण करायचे असून त्यापुढील १५ वर्षांची देखभाल अशाप्रकारे एकूण १९ वर्षांचा कालावधी या प्रकल्पासाठी असेल

मलजल प्रक्रिया केंद्रांसाठी कोणत्या कंत्राटदाराची निवड, किती कोटींची बोली

भांडुप मलजल प्रक्रिया केंद्र 

प्रतिदिन क्षमता : २१५दशलक्ष लीटर
निवड झालेल्या कंत्राटदाराचे नाव : आयडब्ल्यूआयएल-ओएमआयएएल-एसपीएमएल ही संयुक्त भागीदारी
कंत्राट किंमत : सुमारे १२६२ कोटी रुपये

धारावी मलजल प्रक्रिया केंद्र

प्रतिदिन क्षमता : ४१८ दशलक्ष लीटर
निवड झालेल्या कंत्राटदाराचे नाव : मेसर्स वेलस्पन ही संयुक्त भागीदारीतील कंपनी
कंत्राट किंमत : सुमारे ४६०० कोटी रुपये आणि विविध करांसह ७५०० कोटी रुपयांमध्ये

वरळी मलजल प्रक्रिया केंद्र 

प्रतिदिन क्षमता : ५०० दशलक्ष लीटर
निवड झालेल्या कंत्राटदाराचे नाव : सुएझ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व सुएझ इंटरनॅशनल ही कंपनी
कंत्राट किंमत : सुमारे ५८०० कोटी रुपये आणि विविध करांसह ९३०० कोटी रुपये

मालाड मलजल प्रक्रिया केंद्र

प्रतिदिन क्षमता : ४५४ दशलक्ष लीटर
निवड झालेल्या कंत्राटदाराचे नाव : सीसी लिमिटेड ही कंपनी
कंत्राट किंमत : सुमारे ६३७० कोटी रुपये आणि विविध करांसह १०,४५० कोटी रुपये

घाटकोपर मलजल प्रक्रिया केंद्र

प्रतिदिन क्षमता : ३३७ दशलक्ष लीटर
निवड झालेल्या कंत्राटदाराचे नाव : जीव्हीपीआर इंजिनिअर्स लिमिटेड,
कंत्राट किंमत : सुमारे २५५० कोटी रुपये आणि विविध करांसह ४०७० कोटी रुपये

वांद्रे मलजल प्रक्रिया केंद्र

प्रतिदिन क्षमता : ३२५ दशलक्ष लीटर
निवड झालेल्या कंत्राटदाराचे नाव : लार्सन अँड टुब्रो
कंत्राट किंमत : सुमारे ४२९३ कोटी रुपये आणि विविध करांसह ६८७० कोटी रुपये

वर्सोवा मलजल प्रक्रिया केंद्र

प्रतिदिन क्षमता : १८० दशलक्ष लीटर
निवड झालेल्या कंत्राटदाराचे नाव : सीसी लिमिटेड ही कंपनी
कंत्राट किंमत : सुमारे १६०० कोटी रुपये आणि विविध करांसह २५७० कोटी रुपये

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.