उच्च न्यायालयाकडून मुख्यमंत्र्याच्या विरोधात सुओमोटो याचिका दाखल

138

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साताऱ्यातील खिरवंडी गावात दोन हेलिपॅड आहेत. पण रस्ते, पूल, रूग्णालये आणि शाळा अशा प्राथमिक सुविधा नाहीत. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या गावातील पुराच्या पाण्यातून शाळेत जाणाऱ्या मुलींचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने सुओमोटो  याचिका दाखल करून घेतली होती. या याचिकेवर सुनावणी झाली असून ही परिस्थिती बदलेल अशी अपेक्षा उच्च न्यायालयाने व्यक्त केली आहे.

खिरवंडी गावातील व्हिडिओ

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांचे सातारा जिल्ह्यातील खिरवंडी हे मूळगाव आहे. त्या गावात शाळा, रस्ते, वीज अशा प्राथमिक सुविधांची वाणवा आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी पुराच्या पाण्यातून शाळेत जाणाऱ्या मुलींचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. कोयना नदीतील पुराच्या पाण्यातून शाळेत जाणाऱ्या मुली या व्हिडिओत दिसत होत्या. त्यानंतर उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात सुमोटो याचिका दाखल केली होती. आता या याचिकेवर न्यायालयात सुनावणी झाली आहे.

(हेही वाचा अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांचे पुनर्वसन सप्टेंबर अखेरपर्यंत तात्पुरत्या निवासांत)

३० ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करा

मुख्यमंत्र्यांच्या गावातील मुलींचा शाळेतील जीवघेणा प्रवास थांबावा यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशा सूचना उच्च न्यायलयाने दिल्या आहेत. त्याचबरोबर मुख्य सचिवांनी संबंधित विभागाच्या सचिवांशी बैठक घेऊन योग्य त्या सकारात्मक योजना राबवाव्यात आणि सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव पदाच्या अधिकाऱ्याच्या प्रतिज्ञापत्रासह हा अहवाल ३० ऑगस्टपर्यंत न्यायालयात सादर करावा अशा सूचना न्यायलयाने दिल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.