मीरा भाईंदर महापालिकेत शिवसेना-शिंदे गटात दावे-प्रतिदावे! फुटलेल्या नगरसेवकांच्या संख्येवरून संभ्रम

139

गुरुवारी, १४ जुलै रोजी मीरा-भाईंदर महापालिकेतील १८ नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्याचा दावा केला आहे. हे नगरसेवक आमदार प्रताप सरनाईक यांच्या संपर्कात असल्याचे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. या सर्व नगरसेवकांचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले. पण काही वेळातच उद्धव ठाकरे गटाने एक यादीच जाहीर केली, त्यात एकनाथ शिंदे यांचा दावा खोटा ठरवत त्यांच्यासह दहा नगरसेवकांची यादी जारी केली.

मुख्यमंत्री शिंदे यांनी मीरा-भाईंदर महापालिकेत शिवसेनेच्या १८ नगरसेवक आपल्याला गटात येऊन मिळाले आहेत, असा दावा स्वतः मुख्यमंत्री म्हणाले. यासंदर्भात खुद्द मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली, मात्र आता स्थानिक पातळीवरून आलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे गटातून एकनाथ शिंदे गटात केवळ ९ नगरसेवक गेले असल्याची माहिती समोर आली आहे.

(हेही वाचा ऐन पावसाळ्यात पाणी संकट! ‘या’ भागातील पाणी पुरवठा १५ जुलैला ४ तास बंद)

काय आहे शिंदे गटाचा दावा? 

2017 मध्ये मीरा भाईंदर नगरपालिकेत एकूण 22 नगरसेवक निवडणूक जिंकून आले. त्यापैकी 2 नगरसेवक भारतीय जनता पक्षात गेले. यानंतर एका नगरसेवकाचा मृत्यू झाला. त्यामुळे शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवकांची संख्या १९ झाली आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्यासोबत शिवसेनेचे 18 नगरसेवक आपल्या गटात सामील झाल्याचे त्यांनी जाहीर केले.

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने दावा फेटाळला

शिंदे गटाच्या दाव्यानंतर उद्धव ठाकरे गटाने थेट यादी जाहीर केली. त्यात 10 नगरसेवक अद्यापही शिवसेनेत आहेत, असा दावा केला आहे. त्यात शिवसेनेच्या गटनेत्या नीलम धवन, माजी उपमहापौर कॅटलिन परेरा, माजी विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील, जयंती पाटील, तारा घरत, स्नेहा पांडे, भावना भोईर, अर्चना कदम, दिनेश नलावडे, शर्मिला बागची यांची नावे आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.