High Court Verdict: पत्नीने मंगळसूत्र काढणं ही पतीसाठी मानसिक क्रूरता!

152

एखाद्या व्यक्तीची पत्नी ही त्याच्यापासून वेगळी राहत असेल आणि तिने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून टाकले असेल तर ते पतीसाठी मानसिक क्रौर्य समजले जाईल, असे मद्रास उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणासंदर्भात मद्रास उच्च न्यायालयाने पतीचा घटस्फोट अर्ज देखील मंजूर केला आहे.

न्यायालयाने काय सांगितले

न्यायमूर्ती व्हीएम वेलुमणी आणि न्यायमूर्ती एस. साँथर यांच्या खंडपीठाने इरोड येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या सी. शिवकुमार यांच्या याचिकाकर्त्याला अनुमती देताना आणि यांच्या याचिकेवर सुनावणी करताना हे निरीक्षण नोंदवले आहे. दरम्यान, पती-पत्नीच्या घटस्फोटाचे कारण मंगळसूत्र बनले असून यासंदर्भात मद्रास उच्च न्यायालयाकडून पतीची याचिका मंजूर झाली आहे. स्थानिक कौटुंबिक न्यायालयाचा 15 जून 2016 रोजीचा आदेश रद्द करण्याची मागणी केली होती, ज्यामध्ये पत्नीने घटस्फोट देण्यास नकार दिला होता.

(हेही वाचा – तुम्ही SBI ग्राहक आहात? बँकेने वाढवले कर्जाचे व्याजदर; बघा वाढलले नवे दर)

महिलेने काय केले स्पष्ट

याप्रकरणी महिलेची चौकशी केली असता तिने कबूल केले की विभक्त होण्याच्या वेळी तिने तिचे मंगळसूत्र म्हणून एक सोन्याची साखळी घातली होती, आणि नंतर ती काढून टाकली होती. मात्र आता त्या महिलेने ती साखळी काढून टाकली असून यानंतर मी केवळ साखळी काढून ते सोन्याचे प्रतिक ठेवले असल्याचे त्या महिलेने स्पष्ट केले आहे. याप्रकरणी महिलेच्या वकिलांनी हिंदू विवाह कायद्याच्या कलम 7 चा हवाला देऊन सांगितले की, महिलेने मंगळसूत्र घालणे आवश्यक नाही आणि त्यामुळे पत्नीने ते काढून टाकल्याने वैवाहिक नातेसंबंधावर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही वकिलांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.