मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता झटपट मिळणार तिकीट

172

मुंबईतील रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी तसेच मुंबईकरांचा प्रवास सुकर करण्यासाठी मध्य व पश्चिम रेल्वेने मुंबई विभागाच्या स्थानकातील एटीव्हिएमची (ATVM) संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावर झटपट तिकीट मिळण्यासाठी २६३ नवीन एटीव्हिएम (ATVM) बसविण्यात येणार आहेत. सध्या मध्य रेल्वे उपनगरीय स्थानकात ४७६ आणि पश्चिम रेल्वे मार्गावर ३४३ एटीव्हिएम मशिन आहेत. ATVM मशिनमधून काढल्या जाणाऱ्या तिकीटांचे प्रमाण तुलनेने तिकीट खिडक्यांवरून काढल्या जाणाऱ्या तिकिटांपेक्षा मध्य रेल्वेवर २८ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर हे प्रमाण त्याहून अधिक आहे.

( हेही वाचा : बेस्ट इलेक्ट्रिक बसचे कंत्राट रखडणार? सर्वोच्च न्यायालय करणार परीक्षण )

ATVM ची संख्या वाढवणार 

कोरोना काळापूर्वी एटीव्हिएममधून रोज लाखांहून अधिक तिकीटे काढली जात होती. परंतु कोरोना काळ सुरू झाल्यानंतर तिकीट खिडक्यांव्यतिरिक्त एटीव्हिएमसह अन्य तिकीट सुविधा बंद ठेवण्यात आल्या होत्या. निर्बंध शिथिल झाल्यानंतर व प्रवासी संख्याही वाढल्याने एटीव्हिएम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे.

पश्चिम रेल्वेवर ११३ तर मध्य रेल्वेवर १५० नवे ATVM

तिकीट खिडक्यांसोबत एटीव्हिएम मशिन समोर सुद्धा प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने रेल्वेने एटीव्हिएमची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार सध्या रोज ३६ उपनगरीय स्थानकात असलेल्या एटीव्हिएममधून प्रतिदिन ९९ हजार ९१ तिकीटे काढली जातात. चर्चगेट ते डहाणूपर्यंत या एटीव्हिएमची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये ११३ नवीन एटीव्हिएम बसविण्यात येणार आहेत. लवकरच अंतिम निर्णय होऊन एटीव्हीएम टप्प्याटप्प्यात बसवले जातील.

तर मध्य रेल्वे मार्गावर ८० उपनगरीय स्थानकात एटीव्हिएम असून दररोज ४७ हजार तिकिटे काढली जातात. आता आणखी १५० नवीन ATVM बसविण्यात येणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.