IRCTC च्या स्पेशल टूर पॅकेजसह खिशाला परवडेल अशा बजेटमध्ये करा नेपाळची सैर!

133

तुम्हाला कमी पैशात आणि खिशाला परवडेल अशा किंमतीत नेपाळची सैर करायची असेल, तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. त्यामुळे कमी पैशात परदेशात जायचे असल्यास नेपाळ हा एक उत्तम पर्याय आहे. या ठिकाणची भाषा, खाद्यपदार्थ आणि जीवनशैली भारतासारखीच असली तरी दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. त्यामुळे तुम्हालाही नेपाळला जायचे असेल, तर IRCTC ने एक उत्तम टूर पॅकेज तुमच्यासाठी आणले आहे.

(हेही वाचा – तुम्ही चहाचे शौकिन आहात? तर चहासोबत चुकूनही खाऊ नका ‘या’ गोष्टी)

कसा आहे IRCTC नेपाळ टूर पॅकेज

Naturally Nepal Ex Bhopal हे पॅकेजचे नाव असून यामध्ये काठमांडू, पोखरा येथे विशेष भेट देता येणार आहे. या पॅकेजचा कालावधी 6 दिवस आणि 5 रात्र असा आहे. या टूरवर जाण्यासाठी फ्लाईट हा पर्याय IRCTC ने दिला असून 8 ऑगस्ट 2022 रोजी ही टूर निघणार आहे.

पॅकेजमध्ये या सुविधा मिळणार

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, नेपाळ टूर पॅकेजमध्ये पर्यटकांना भोपाळ ते दिल्ली, नंतर दिल्ली ते काठमांडू आणि येताना देखील दिल्ली ते भोपाळ अशी विमानसेवाही देण्यात येणार आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला 3 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा देण्यात येणार आहे. तसेच या टूर पॅकेजमध्ये नाश्ता आणि रात्रीच्या जेवणासह नेपाळमध्ये पोहचल्यानंतर फिरण्यासाठी कॅब उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी भेट द्यायची आहे, त्या ठिकाणाची माहिती देण्यासाठी टुरिस्ट गाइडही देण्यात येणार आहे. तर याशिवाय जर तुमचे वय ७० वर्षांपेक्षा जास्त असल्यास तुम्हाला प्रवास विम्याची सुविधाही देण्यात येणार आहे.

किती असेल पॅकेजची किंमत?

या पॅकेजमध्ये एकट्याने प्रवास करण्यासाठी तुम्हाला 46,900 रुपये मोजावे लागतील. तर दोन लोकांसाठी 38,700 रुपये आणि तीन जणांना 38,400 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. याशिवाय मुलांसाठी तुम्हाला वेगळे तिकीट बुक करावे लागणार आहे.

असे करता येणार बुकिंग

तुम्ही या टूर पॅकेजसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून बुकिंग करू शकता. याशिवाय आयआरसीटीसी टुरिस्ट फॅसिलिटेशन सेंटर, झोनल ऑफिस आणि रिजनल ऑफिसमधूनही बुकिंग करता येईल. पॅकेजशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही IRCTC अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.