दीपक केसरकर हे चांगले प्रवक्ते आहेत. परंतु सध्या त्यांचा सूर लागत नाही. सध्या शिवसेना आणि भाजपा यांच्या वाक्-युद्ध सुरु आहे. राणे कुटुंब आणि ठाकरेंची दुश्मनी सर्वांनाच परिचित आहे. त्यात ठाकरे व ठाकरेंच्या शिवसेनेने किरीट सोमय्या यांनाच्यावर वैयक्तिक टिका करुन त्यांना बर्याचदा दुखावले आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे ठाकरे आणि राऊतांनी सोमय्यांच्या शारीरिक व्यंगावर टीका केली होती. त्यामुळे भाजपा आणि शिवसेनेमध्ये हे वाक्-युद्ध सुरुच राहणार आहे.
( हेही वाचा : पावसाळी अधिवेशन लांबणीवर, मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर निर्णय?)
पण आता ठाकरेंवर टीका केल्यावर केसरकरांना त्रास होतो ही नवीनच बाब समोर आलेली आहे. मुळात केसरकर हे काँग्रेस संस्कृतीतले. ती संस्कृती सोडून ते शिवसेनेत आले. आता तर ठाकरेंना सोडचिठ्ठी देऊन ते शिंदे गटात आलेत. या गटाने भाजपासोबत सत्ता स्थापन केलेली आहे. कदाचित केसरकर यांसारख्या ज्येष्ठ नेत्याला मंत्रीपद देखील मिळेल. तरी त्यांचं ठाकरे-प्रेम काहू कमी व्हायला मागत नाही. राणे कुटुंबाकडून ठाकरेंवर सतत टिका होत असते म्हणून केसरकर भडकले आहेत.
केसरकर राणेंवर बरसले. त्याला पत्युत्तर म्हणून निलेश राणेंनी ’दीपक केसरकर इज्जत मिळते तर ती घ्यायला शिका, लायकी पेक्षा जास्त बोलू नका.’ अशी खरमरीत टिका केलेली आहे. राणे-केसरकर यांच्यातील वाद महाराष्ट्राला ज्ञात आहे. यापुर्वी देखील या दोघांमध्ये प्रचंड वाक्-युद्ध झालं होतं. राणेंनी कोकणावरची आपली सत्ता अबाधित ठेवलेली आहे. त्यावेळी दोघे राजकीयदृष्ट्या शत्रू होते. परंतु राणे भाजपात असल्याने दोघांचाही पक्ष राज्यात सत्तेवर आहे.
अशा परिस्थितीत दोघांनीही आपले वाद गुंडाळायला हवेत. नाहीतर यामुळे युतीवर परिणाम होऊ शकतो. संजय राऊतांच्या बेताल बडबडण्यामुळे अनेक नेते नाराज झाले होते. तोच कित्ता केसरकरांनी गिरवू नये. ठाकरेंना सोडल्यानंतर आता त्यांचे नेते एकनाथ शिंदे आहेत, याचा विसर त्यांना पडला तर पुढे राणे-केसरकर सामना बघायला मिळेल. म्हणूनच हीच वेळ आहे सावरण्याची…
Join Our WhatsApp Community