चंद्रपुरातील पूरस्थितीमुळे दीडशे कामगार अडकले मध्यप्रदेशात

116

सध्या राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे राज्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूर्व विदर्भात सध्या भीषण पूरपरिस्थिती आहे. रस्ते पाण्याखाली गेले आहेत. याचा मोठा फटका तिथल्या लोकांना बसत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे मध्य प्रदेशातून हैदराबादकडे निघालेले जवळपास दीडशे कामगार महाराष्ट्रात अडकले आहेत.

तीन दिवसांपासून प्रवासी बसमध्ये अडकलेत 

महाराष्ट्राला तेलंगणाशी जोडणारा राजुरा शहरा जवळचा मोठा पूल वर्धा नदीच्या पुरामुळे पाण्याखाली गेला आहे. गेल्या तीन दिवसांपासून हे प्रवासी बसमध्ये अडकून पडले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात सात दिवसांपासून जोरदार अतिवृष्टी होत असल्याने नदी-नाल्यांना आला आहे. त्यामुळे बसमध्येच अडकलेल्या महिला, मुले आणि पुरुषांना हैदराबाद इथे आपल्या कामाच्या स्थळी जाण्याची प्रतीक्षा आहे. अडकलेल्या कामगारांना स्थानिक लोकांच्या मदतीने भोजन व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात येत आहे.  मात्र पूर केव्हा ओसरेल आणि वाहतूक केव्हा सुरू होईल याकडे या कामगारांचे लक्ष लागले आहे. पुलाच्या दोन्ही टोकाला बसेस आणि मालवाहू ट्रक यांच्या रांगा लागल्या आहेत. तीन दिवसांपासून हे प्रवासी  बसमध्ये अडकून पडले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात सात दिवसांपासून जोरदार अतिवृष्टी होत असल्याने नदी-नाल्यांना पूर आला आहे.

(हेही वाचा प्रवेश घेताय तर जाणून घ्या, कोणत्या महाविद्यालय, विद्यापीठाचा किती आहे रँकिंग? )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.