शुक्रवारपासून देशभरात प्रौढांना ७५ दिवस मोफत बुस्टर डोस देण्याचे केंद्र सरकारने आयोजन केले आहे. मुंबईत शुक्रवारी पहिल्याच दिवशी १४ हजार १९५ प्रौढांनी बुस्टर डोस घेतल्याने पालिका आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
( हेही वाचा : रविवारी बाहेर निघताय? मध्य आणि हार्बर मार्गावर या वेळेत असणार मेगाब्लॉक)
बूस्टर डोसचे १४ हजार १९५ लाभार्थी
मुंबईतील पालिका रुग्णालये, लसीकरण केंद्रे, सरकारी रुग्णालये तसेच खासगी लसीकरण केंद्रात मिळून पहिल्या दिवशी १४ हजार १९५ जणांनी बुस्टर डोस घेतला. शुक्रवारच्या दिवशी ३७८ फ्रंट लाईन वर्कर्स यांनी बुस्टर डोस घेतला. १ हजार ४४७ लाभार्थी हे ६० वर्षांपुढील होते. ४५ ते ५९ वयोगटातील ४ हजार ७६६ नागरिकांना बूस्टर डोस घेतला. १८ ते ४४ वयोगटातील ७ हजार ६०४ जणांना बुस्टर डोस दिला गेला. यात स्तनपान करणा-या मातांचाही समावेश होता. परंतु त्याची नेमकी आकडेवारी मिळू शकली नाही.
Join Our WhatsApp Community