शिवसेनेतून नेते, पदाधिका-यांची गळती सुरुच आहे. शिवसेना फुटल्यानंतर, पक्ष बांधणी नव्याने करण्याचे प्रयोजन केलेल्या उद्धव ठाकरेंनी पक्षविरोधी कारवाया करणा-यांविरोधात कडक भूमिका घेतली आहे. आता विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे आदेश जारी केले. शिवसेनेच्या मुखपत्रातून ही माहिती देण्यात आली आहे.
( हेही वाचा: ‘छत्री’ ही पावसापासून संरक्षणासाठी बनलीच नव्हती; वाचा छत्रीच्या उगमाचा रंजक इतिहास )
शिंदे गटात सहभागी झाल्याने कारवाई
पक्षाच्या विरोधात काम केल्याने आणि पक्षाची शिस्त मोडल्यानंतर विजय शिवतारे यांना शिवसेनेने अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. शिवतारे यांचे शिवसेना सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून ही माहिती देण्यात आली आहे. विजय शिवतारे हे शिवसेनेचे माजी आमदार असून ते पुरंदर तालुक्यातून शिवसेनेचे प्रतिनिधित्व करत होते. विजय शिवतारे यांनी एकनाथ शिंदे गटाला समर्थन दिल्यानंतर, त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे. विजय शिवतारे यांनी शिंदे गटात जात असल्याचा निर्णय नुकताच जाहीर केला होता.
Join Our WhatsApp Community