शिंदे- फडणवीस सरकारची तिसरी मंत्रिमंडळ बैठक 16 जुलै शनिवारी संपन्न झाली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा केली आहे.
मविआ सरकार पायउतार होत असताना, काही निर्णय घाई घाईने घेण्यात आले होते. त्याबाबत आता शिंदे सरकारने निर्णय घेतले आहेत. नामांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करत, औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव आणि नवी मुंबई विमानतळाचे नाव दि.बा. पाटील करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदुत्वाच्या दृष्टीकोनातून हा मोठा निर्णय असल्याचे, म्हटले जात आहे.
एमएमआरडीएला ६० हजार कोटींचे कर्ज उभारण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. तसेच पहिल्या टप्प्यात १२ हजार कोटींच्या रकमेस शासन हमी देणार असल्याचे, मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
( हेही वाचा: पावसामुळे रद्द झालेल्या विद्यापीठाच्या परीक्षा लवकरच; नवे वेळापत्रक जाहीर )
Join Our WhatsApp Community