सहकारी पतसंस्थांमधील ठेवींवर आता मिळणार १० टक्क्यांपर्यंत व्याज

135

राज्यातील पतसंस्थामध्ये ठेवण्यात येणाऱ्या ठेवींवर आता १० टक्क्यांपर्यंत व्याज मिळणार आहे. तसेच तारण कर्जावरील व्याजदर १२ टक्के होता तो आता १४ टक्के आणि विनातारण कर्जावर कमाल १६ टक्के व्याजदर लागू करण्याचा निर्णय सहकार विभागाने पतसंस्था नियामक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे पतसंस्थांना आर्थिकदृष्ट्या बळकटी मिळू शकते.

( हेही वाचा : Monsoon Food : पावसाळ्यात गरमागरम वडापाव खाण्यासाठी ‘या’ आहेत मुंबईतील TOP 10 जागा!)

कमाल व्याजदर १० टक्के

नियामक मंडळाच्या सभेत व्याजदर वाढीचा निर्णय घेण्यात आला. बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी राज्यातील सर्व बिगर कृषी पतसंस्थांनी करावी असेही नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार नागरी, ग्रामीण, कर्मचारी बिगर कृषी सहकारी पतसंस्थांमधील ठेवींवरील व्याजदर १० टक्के राहील. तारण कर्जालरील कमाल व्याजदर १४ टक्के आणि विनातारण कर्जावरील कमाल व्याजदर १६ टक्के राहील असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेले जनजीवन आणि हवामान खात्याने दिलेला इशारा विचारात घेता राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका येत्या ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. राज्यभरात ३२ हजार ७४३ सहकारी संस्था निवडणुकीस पात्र आहेत. त्यापैकी ७ हजार ६२० संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. त्यात नामनिर्देशन सुरू असणाऱ्या ५ हजार ६३६, तर नामनिर्देशन सुरू नसलेल्या १ हजार ९८४ सहकारी संस्थांचा समावेश आहे. बहुतांश सहकारी संस्था या ग्रामीण भागात असून, त्यांची सदस्य मोठी आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.