WiFi चा वापर करण्यात मध्य रेल्वेचे हे स्थानक आघाडीवर! CSMT स्थानकालाही टाकले मागे

259

प्रवाशांना इंटरनेटचा विनाअडथळा वापर करता यावा यासाठी पश्चिम व मध्य रेल्वे उपनगरीय स्थानकांमध्ये मोफत वायफाय (WiFi) सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. मध्य रेल्वे मार्गावर वायफायचा सर्वाधिक वापर कल्याण या स्थानकावर केला जातो. या स्थानकात मे २०२२ मध्ये एकूण १५ हजारांहून अधिक प्रवाशांनी वायफायचा वापर केला असून सुमारे ४ हजार ९४३ गिगाबाईट्सपेक्षा अधिक डेटा वापरण्यात आल्याची माहिती रेलटेलकडून देण्यात आली आहे. कल्याण स्थानकानंतर सीएसएमटी, ठाणे आणि पश्चिम रेल्वेवरील बोरीवली स्थानकाचा क्रमांक लागतो.

वायफायद्वारे आपण चित्रपट पाहणे, गाणी डाऊनलोड करणे विविध विषयांची माहिती मिळवणे अशा बऱ्याच गोष्टींचा लाभ घेतो. रेल्वे प्रवाशांना मोफत वायफाय उपलब्ध झाल्यास त्यांचे मनोरंजन होण्यास मदत होते म्हणूनच देशभरातील ४०० स्थानकांमध्ये मोफत वाफवाय सेवा देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला होता.

रेलटेलने दिलेल्या माहितीनुसार सध्या मध्य रेल्वेवरील कल्याण स्थानकात प्रवासी मोठ्या संख्येने वायफायचा वापर करत आहेत. गेल्या मे महिन्यात १५ हजार ११५ प्रवाशांनी एकूण ४ हजार ९४३ गिगाबाईट्स डेटा वापरला आहे. यानंतर सीएसएमटी स्थानकात सहा हजार ७८८ प्रवाशांनी वायफायचा वापर केला.

महत्त्वाच्या स्थानकातील मे महिन्यातील वापरकर्ते

  • चर्चगेट – २ हजार ६२३
  • मुंबई सेंट्रल – २ हजार ११०
  • दादर ( पश्चिम रेल्वे ) – ३ हजार ७२९
  • अंधेरी – ३ हजार ७०८
  • विरार – २ हजार ७२२
  • दादर ( मध्य रेल्वे ) – १ हजार ८०४
  • डोंबिवली – ३ हजार ६१६
  • वडाळा – ३ हजार २०२
  • वाशी – ५ हजार ८५
  • पनवेल – ४ हजार ८९६

वायफायसाठी शुल्क आकारणी

प्रवाशांना मार्च २०२१ पासून वायफायसाठी शुल्क आकारण्यास सुरूवात करण्यात आली आहे. वायफायचा ३० मिनिटे मोफत वापर करता येतो. त्यानंतर वायफायचा वापर करण्यासाठी पैसे भरावे लागतात.

  • प्रतिदिन डेटा ५ जीबी डेटा – १० रुपये
  • ३० दिवसांपर्यत ६० जीबीसाठी – ७० रुपये
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.