सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा मार्ग मोकळा

177

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमुळे जनतेची सोय होणार असून तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे रुग्णांना गोवा येथे जाण्याची आवश्यकता भासणार नाही. हे हॉस्पिटल लवकरात लवकर उभे राहण्यासाठी सर्व अडचणींवर सकारात्मक रितीने मार्ग काढावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

( हेही वाचा : WiFi चा वापर करण्यात मध्य रेल्वेचे हे स्थानक आघाडीवर! CSMT स्थानकालाही टाकले मागे)

सह्याद्री अतिथीगृहात बैठक

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्रश्नांसंदर्भात शनिवारी मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेतली. यावेळी आंबोली (चौकुळ) व गेळे येथील कबुलायतदार गावकर सदरातील जमिनीच्या वाटपाबाबत, मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपकेंद्रासाठी आंबोली येथील जागा देण्याबाबत, आंबोली येथील एम.टी.डी.सी.च्या ताब्यातील पायाभूत सुविधा असलेली इमारत हॉस्पिस्टॅलिटी मॅनेजमेंट कोर्सेस चालविण्याकरिता मुंबई विद्यापीठाला मिळण्याबाबत, तसेच वेंगुर्ला येथे सिंधु स्वाध्यायसाठी मुंबई विद्यापीठाला जागा देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.