बदलापुरात शिवसेनेला मोठा झटका, २५ नगरसेवक शिंदे गटात

141

एकनाथ शिंदे गटाने भाजपासोबत सत्ता स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने राज्यातील शिवसेनेत उभी फूट पाडत आहेत. त्यानुसार बदलापूर येथील २५ नागरसेवक शनिवारी, १६ जुलै रोजी शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

ठाणे जिल्हा परिषदेत गळती 

एकनाथ शिंदे यांच्या गटाने राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेला जागोजागी गळती लागली आहे. शिवसेनेने यानंतर ठिकठिकाणी बैठकांचा सपाटा लावला आहे. मात्र या बैठका निष्फळ ठरत असल्याचे सध्या राजकीय घडामोडींवरुन स्पष्ट होत आहे. बदलापुरातील सर्वच्या सर्व नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेला हा जबरदस्त धक्का समजला जात आहे. बदलापुरातील या एकूण 25 नगरसेवकांनी शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवर बंगल्यावर भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी या नगरसेवकांचे पुष्पगुच्छ देत आपल्या गटात स्वागत केले. यावेळेस या नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांनीही एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. दरम्यान या नगरसेवकांच्या व्यतिरिक्त ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार, अंबरनाथ पंचायत समिती सभापती अनिता निरगुडा, अंबरनाथ तालुकाप्रमुख बाळाराम कांबरी हे देखील शिंदे गटात सहभागी झाले आहेत.

(हेही वाचा देवेंद्र फडणवीसांनी माईक, चिठ्ठीवरून केले विनोद!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.