मोदींच्या बदनामीसाठी काँग्रेसने 30 लाख रुपये दिलेत- संबित पात्रा

233

काँग्रेसने तत्कालीन गुजरात सरकार पाडण्यासाठी तिस्ता सेटलवाडला 30 लाख रुपये दिल्याचा आरोप भाजप नेते डॉ. संबित पात्रा यांनी केला आहे. तिस्ता सेटलवाड, दिवंगत अहमद पटेल आणि इतरांनी षडयंत्र करून गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याचे प्रतिज्ञापत्र एसआयटीने सेशन कोर्टात दाखल केले आहे, यावरून भाजपने हे गंभीर आरोप केले आहेत.

( हेही वाचा :

यामागे खऱ्या सूत्रधार सोनिया गांधीच होत्या

यासंदर्भात पात्रा म्हणाले की, तिस्ता सेटलवाडने गुजरात सरकारला पाडण्यासाठी आणि पंतप्रधान मोदींना या प्रकरणात ओढण्यासाठी जे प्रयत्न केले ते काँग्रेसच्या सांगण्यावरून केले असून यासाठी काँग्रेसने तिस्ताला सुमारे 30 लाख रुपये दिले होते. तिस्ताने जे काही केले ते केवळ गुजरात आणि मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी केले, असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.सत्ता मिळवण्यासाठी हा सारा कट रचला असून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांच्या तिजोरीतून तीस्ता सेटलवाड यांना वैयक्तिक वापरासाठी पैसे दिले होते. ही खेळी अहमद पटेल यांची असली तरी यामागे खऱ्या सूत्रधार सोनिया गांधीच होत्या, असेही त्यांनी सांगितलं आहे. कारण त्यावेळी अहमद पटेल हे तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार होते.

संबित पात्रा म्हणाले की, या प्रकरणाशी संबंधित सर्व सूत्रधार रात्रीच्या अंधारात संजीव भट्ट, तिस्ता सेटलवाड, श्रीकुमार अहमद पटेल यांच्या घरी भेटले होते. त्यानंतर गुजरात सरकार पाडून नरेंद्र मोदींची प्रतिमा डागाळावी यासाठी त्यांनी काँग्रेसच्या बड्या नेत्यांचीही भेट घेतली होती, असंही त्यांनी सांगितले आहे. एसआयटीने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी सेटलवाड सुरुवातीपासूनच या कटाचा भाग होत्या. गोध्रा ट्रेनच्या घटनेनंतर काही दिवसांनी अहमद पटेल यांच्याशी त्यांची भेट झाली होती. पहिल्या घटनेसाठी त्यांना 5 लाख रुपये देण्यात आले होते. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याच्या सूचनेवरून या सर्व घडामोडी घडल्या आहेत असे पात्रा यांनी सांगितले.

गुजरात सरकार अस्थिर करण्यासाठी काँग्रेसने दिले पैसे

एसआयटीने शुक्रवारी कोर्टात सादर केलेल्या आपल्या अहवालात दावा केला होता की, सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांना 2002 मध्ये गुजरात सरकार अस्थिर करण्यासाठी काँग्रेसने पैसे दिले होता. 2002 च्या गोध्रा ट्रेन जाळण्याच्या घटनेनंतर सेटलवाड गुजरातमधील निवडून आलेले सरकार अस्थिर करण्यासाठी एक मोठा कट रचत होत्या. याशिवाय त्यांना प्रतिस्पर्धी राजकीय पक्षातील एका बड्या नेत्याची आर्थिक मदतही मिळाली होती

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.